"सासू-सासऱ्यांमुळे माझं घर तुटलं..."; टीव्ही अभिनेत्रीचं मोठं विधान, म्हणाली- "माझा नवरा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 14:22 IST2026-05-04T14:16:36+5:302026-05-04T14:22:44+5:30

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. परंतु अवघ्या २ महिन्यांत ही अभिनेत्री पतीपासून वेगळी होऊन घटस्फोट घेण्याच्या विचारात आहे. यासाठी अभिनेत्रीने सासू-सासऱ्यांना जबाबदार धरलं आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. परंतु अवघ्या २ महिन्यांत ही अभिनेत्री पतीपासून वेगळी होऊन घटस्फोट घेण्याच्या विचारात आहे. यासाठी अभिनेत्रीने सासू-सासऱ्यांना जबाबदार धरलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे नबीहा अली खान.

नबीहाने एका मुलाखतीत तिच्या सासू-सासऱ्यांवर लग्न मोडल्याचा राग काढला. ''लग्न झाल्यावर माझ्या सासू-सासऱ्यांनी माझ्या पतीवर जणू कब्जा केला. ते लोक माझं घर तोडत होते. माझ्या नवऱ्याला माझ्याजवळ येऊ देत नव्हते.''

नबीहा पुढे म्हणाली, ''माझा पती पूर्ण दिवस त्याच्या आई-वडिलांसोबतच असायचा. तो मला अजिबात वेळ द्यायचा नाही. मी रात्री येईल आणि सकाळी लवकर घरी जाईल, असं तो सांगायचा''

''मला फक्त ४ तासांसाठी माझा नवरा नको होता. पती माझ्यासोबत राहील अशी माझी इच्छा होती. मला त्याच्यासोबत राहायचं होतं. पण इतका तमाशा झाला आणि सर्वांनी माझ्यावरच आरोप ठेवले'', असा खुलासा नबीहाने केला.

''या लोकांनी माझ्याच देशात माझी इज्जत चव्हाट्यावर आणली. माझं संसार पुन्हा सुरळित झाला नाही तर मी तुमच्या घरासमोर येऊन स्वतःचा जीव देईल'', असं नबीहा स्पष्टपणे म्हणाली.

२०२५ मध्ये नबीहाने तिचा जवळचा मित्र हारिस खोखरसोबत लग्न केलं होतं. परंतु कौटुंबिक वादांमुळे तिच्या घरी रोज भांडणं व्हायची. यामुळेच तिने घटस्फोटाचा विचार केला होता.

विशेष गोष्ट म्हणजे, नबीहा स्वतः एक मोटिव्हेशनल स्पीकर आहे. याशिवाय ती लोकांना लग्न आणि नात्यांविषयी समुपदेशन देण्याचं काम करत असते. परंतु आज तिचाच संसार तुटण्याच्या मार्गावर आहे. ती पाकित्सान येथील प्रसिद्ध टीव्ही अँकर आणि मोटिव्हेशनल स्पीकर आहे.