PICS : पोल्का डॉट ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचं फोटोशूट, फोटो पाहून पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 01:19 PM2021-08-04T13:19:58+5:302021-08-04T13:25:08+5:30

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखचे हे सुंदर फोटो तुम्हाला वेड लावतील.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखचे हे सुंदर फोटो तुम्हाला वेड लावतील.

होय, आपल्या गोड हास्यानं चाहत्यांची मनं जिंकणा-या मयुरीने पोल्का डॉट ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काळ्या आॅफ शोल्डर ड्रेसमधील तिच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलेय.

मयुरीच्या या फोटोंवर सध्या चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. मयुरीची जीवलग मैत्रिण अभिज्ञा भावेही हिनेही या फोटोंवर सुंदर कमेंट केली आहे. ‘माइन’ असं लिहित तिने लव्ह इमोजी दिले आहेत.

मराठमोळी मयुरी सध्या ‘इमली’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिने साकारलेल्या मालिनी या भूमिकेची सध्या जोरदार चर्चा आहे.

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईलसाठी मयुरी ओळखली जाते.

खुलता कळी खुलेना या मालिकेत मयुरीने साकारलेली सरळ साध्या स्वभावाची मानसीला सा-यांची पसंती मिळाली होती.