आई कुठे काय करते: अनिरुद्धचा बदलणार लूक? मिलिंद गवळींचं नवं फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 11:35 AM2022-03-06T11:35:29+5:302022-03-06T11:42:32+5:30

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यावर मालिकेतील त्यांचा लूक चेंज होणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी.

या मालिकेत मिलिंद गवळी, अनिरुद्ध ही नकारात्मक भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवण्यास यशस्वी ठरली आहे.

कलाविश्वाप्रमाणेच मिलिंद गवळी सोशल मीडियावरही सक्रीय असतात. त्यामुळे नेटकरी कायम त्यांच्या नव्या पोस्टची वाट पाहत असतात.

अलिकडेच मलिंद यांनी नवीन फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यावर मालिकेतील त्यांचा लूक चेंज होणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

या फोटोमध्ये अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी फॉर्मल लूकमध्ये दिसून येत आहेत.

सध्या सर्वत्र मिलिंद गवळी यांच्या फोटोशूटची चर्चा होत आहे.