अभिनय सोडून अमेरिकेत स्थायिक झाली 'ही' मराठी अभिनेत्री, आता आहे गोंडस मुलीची आई, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 09:12 AM2023-02-23T09:12:15+5:302023-02-23T09:26:36+5:30

अभिनय क्षेत्राला रामराम करत ही मराठी अभिनेत्री अमेरिकेतच स्थायिक झाली आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'माझिया प्रियाला प्रित कळेना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आहे.

काही मोजक्या मराठी मालिकांमध्ये काम केल्यानंतर मृणालने अभिनय क्षेत्राला रामराम केला आणि ती घरसंसारात व्यस्त झाली.

२०२० पर्यंत मृणालने अभिनय क्षेत्रात काम केले. मृणाल 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत शेवटची दिसली. यातील तिची आणि शशांक केतकरची जोडी प्रेक्षकांनाही आवडली.

२०१६ मध्ये मृणालने नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली. नीरज सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कामानिमित्त तो आधीपासूनच अमेरिकेत असल्याकारणाने नंतर मृणाललाही तिकडेच स्थायिक व्हावे लागले.

सुखाच्या सरींनी मालिकेवेळी ती भारतात आणि नीरज अमेरिकेतच होता. मालिका संपताच ती अमेरिकेत गेली. यानंतर तिचा बदललेला लुक पाहून चाहत्यांनाही विश्वास बसला नाही.

अमेरिकेत असली तरी ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना आयुष्यातील घडामोडींचे अपडेट्स देत असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती सतत फोटो पोस्ट करत असते.

छोट्या केसात मृणालला बघून चाहत्यांना विश्वासच बसला नाही की ही तीच मृणाल आहे.तिचे नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

गेल्याच वर्षी २४ मार्च रोजी मृणालने गोंडस मुलीला जन्म दिला.तिचे नाव नुर्वी असे ठेवण्यात आले.

मृणाल आता पुन्हा अभिनय क्षेत्रात परतणार का याबद्दल तिने अजुन काहीच सांगितलेले नाही. सध्या ती नवरा आणि आता मुलीसोबत अमेरिकेतच आहे. तरी चाहत्यांना मात्र तिच्या कमबॅकची प्रतिक्षा असणार आहे.