'सोनपरी' मधील छोटी फ्रुटी आता दिसते अशी! सिनेसृष्टी सोडून आता 'या' क्षेत्रात करतेय करिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:52 IST2026-04-24T13:39:05+5:302026-04-24T13:52:38+5:30
साल २००० दरम्यान एक मालिका प्रचंड गाजली. त्या मालिकेचं नाव म्हणजे 'सोनपरी'. या मालिकेत मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी झळकली होती. पण सर्वांच्या लक्षात राहिली ती म्हणजे या मालिकेतील फ्रुटी.

साल २००० दरम्यान एक मालिका प्रचंड गाजली. त्या मालिकेचं नाव म्हणजे 'सोनपरी'. या मालिकेत मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी झळकली होती. पण सर्वांच्या लक्षात राहिली ती म्हणजे या मालिकेतील फ्रुटी.

क्यूट फ्रुटीची भूमिका अभिनेत्री तन्वी हेगडेने साकारली. तन्वीने तिच्या निरागस अभिनयाने फ्रुटी लोकप्रिय केली. मालिका संपून इतकी वर्ष झाली तरी आजही फ्रुटी सर्वांच्या लक्षात आहे. तन्वी सध्या अभिनय क्षेत्र सोडून वेगळ्या क्षेत्रात जम बसवत आहे.

तन्वी आता ३४ वर्षांची झाली आहे. ती आता अभिनय क्षेत्र सोडून गेमिंगमध्ये करिअर करत आहे. तन्वीचं स्वतःचं युट्यूब चॅनल असून ती तिथे कॉम्प्युटरच्या विविध गोष्टी आणि गेमिंगचे अनुभव शेअर करताना दिसते.

अत्यंत कमी वयात तन्वीला 'सोनपरी' मालिकेत काम करायची संधी मिळाली. त्यामुळेच बालपणीचे दिवस जगता आले नाहीत, याची खंत तिला आता वाटते

वयाच्या तीन वर्षांपासून तन्वी अभिनय क्षेत्रात काम करत आहे. रसना गर्ल म्हणूनही तन्वीला लोकप्रियता मिळाली. 'सोनपरी'चं शूटिंग चालू होतं तेव्हा सहकलाकार तन्वीचा सेटवरच सांभाळ करायचे.

'सोनपरी'चं शूटिंग जेव्हा अखेरच्या टप्प्यावर होतं तेव्हा तन्वी १० वीत होती. त्यामुळे त्यावेळी मालिकेच्या सेटवरच तन्वी अभ्यास करायची. सहकलाकार तिला खूप मदत करायचे.

सध्या तन्वीने गेमिंग हे वेगळंच क्षेत्र करिअरसाठी निवडलं आहे. तिला विविध प्रकारचे गेम खेळण्याची आवड आहे. एकूणच फ्रुटी अजूनही चाहत्यांची लाडकी आहे

















