मौनी रॉयने टाइट बॉडीकॉन ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, चाहते झाले फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 01:58 PM2023-02-10T13:58:53+5:302023-02-10T14:02:46+5:30

Mouni Roy : या फोटोंमध्ये मौनी रॉयची ग्लॅमरस स्टाईल पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री मौनी रॉय आपल्या प्रोफेशनल लाइफसोबतच आपल्या पर्सनल लाइफवरून सुद्धा काही लाइमलाइटमध्ये असते. मौनी रॉयने लग्न केल्यापासून आपल्या वैवाहिक आयुष्यातील फोटो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात.

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले नवीन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉयची ग्लॅमरस स्टाईल पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

मौनी रॉयचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये मौनी रॉयने व्हाइट कलरच्या टाइट फिटिंग शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये मौनी रॉयची फिट फिगरही स्पष्ट पाहायला मिळत आहे.

फोटोंमध्ये मौनी रॉय वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तसेच, फोटोंमध्ये मौनी रॉय किलर स्टाईलने चाहत्यांची मने घायाळ केली आहेत. मौनी रॉयचा हा बोल्ड अवतार तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

मौनी रॉयच्या फोटोंना चाहत्यांनी लाइक्स आणि विविध कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, मौनी रॉयने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती.

'नागीण' फेम मौनी रॉयने अल्पवधीतच प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या मौनी रॉयने आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपटात मौनी रॉय दिसली होती .