Photos: 'राजा शिवाजी' सिनेमात छोट्या सईबाईंच्या भूमिकेत झळकलेली 'ती' चिमुकली कोण?
By कोमल खांबे | Updated: May 3, 2026 12:33 IST2026-05-03T12:26:36+5:302026-05-03T12:33:16+5:30
'राजा शिवाजी'मध्ये जिनिलीया देशमुखने साकारलेल्या महाराणी सईबाईंच्या भूमिकेने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. पण या सिनेमात छोट्या सईबाईंच्या भूमिकेत झळकलेल्या या चिमुकलीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रितेश देशमुखचं दिग्दर्शन असलेला 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

या सिनेमात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर त्याची दोन्ही मुले बाल शिवाजींच्या भूमिकेत दिसतात.

'राजा शिवाजी'मध्ये जिनिलीया देशमुखने साकारलेल्या महाराणी सईबाईंच्या भूमिकेने सगळ्यांची मनं जिंकून घेतली.

पण या सिनेमात छोट्या सईबाईंच्या भूमिकेत झळकलेल्या या चिमुकलीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

'राजा शिवाजी'मध्ये छोट्या सईबाईंची भूमिका साकारलेली ही चिमुकली नक्की कोण आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात छोट्या सईबाईंची भूमिका साकारलेल्या या चिमुकलीचं नाव किमया मेस्त्री असं आहे.

किमया एक बालकलाकार असून तिला नृत्याचीही आवड आहे. कथ्थक हा नृत्य प्रकार ती सध्या शिकत आहे.

याआधी किमया 'कमळी', 'जय जय स्वामी समर्थ', 'उदे गं अंबे', 'सावळ्याची जणू सावली' या मालिकांमध्ये झळकली आहे.

दिग्पाल लांजेकरांच्या 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या सिनेमातही ती छोट्या भूमिकेत दिसली होती.

आता 'राजा शिवाजी' सिनेमातील तिने साकारलेल्या छोट्या सईबाईंच्या भूमिकेला पसंती मिळत आहे.

















