भरत जाधवची मुलगी आहे कलाविश्वापासून दूर; जाणून घ्या जनसेवा करणाऱ्या त्याच्या लेकीविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 07:00 AM2022-07-18T07:00:00+5:302022-07-18T07:00:00+5:30

Bharat jadhav daughter: वडील प्रसिद्ध अभिनेता असूनही भरतचे दोन्ही मुलं अत्यंत साधे राहतात. इतकंच नाही तर ते प्रकाशझोतापासूनही दूर असल्याचं पाहायला मिळतं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे भरत जाधव. आजवरच्या कारकिर्दीत भरत जाधवने अनेक गाजलेल्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे.

नाटक, मालिका, एकांकिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून तो कायम प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.

उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर भरतने आजवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा रंगत असते.

भरतदेखील शक्य होईल त्या पद्धतीने चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.

बऱ्याचदा भरत त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टसह त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो वा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतो.

सध्या सोशल मीडियावर भरतच्या लेकीची चर्चा रंगली आहे. भरतची थोरली लेक कलाविश्वापासून दूर असून वैद्यकीय क्षेत्रात नशीब आजमावत आहे.

भरतच्या लेकीचं नाव सुरभी जाधव असं असून मागच्या वर्षी ती उत्तम गुणांनी एमबीबीएस परीक्षेत पास झाली. याविषयी भरतने सोशल मीडियावरही पोस्ट शेअर केली होती.

डॉ. सुरभी भरत जाधव हिने पुण्यातील एसकेएनएमसी कॉलेजमधून तिचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आहे.

सुरभी सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही. मात्र, भरत बऱ्याचदा त्याच्या लेकीसोबत वा मुलासोबत फोटो शेअर करत असतो. वडील प्रसिद्ध अभिनेता असूनही भरतचे दोन्ही मुलं अत्यंत साधे राहतात. इतकंच नाही तर ते प्रकाशझोतापासूनही दूर असल्याचं पाहायला मिळतं. (All photos: bharat jadhav instagram page)