PHOTOS : ‘किसना’ची ‘लक्ष्मी’ इतकी बदलली; पाहा, अभिनेत्री ईशा शरवानीचे लेटेस्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 05:55 PM2022-10-09T17:55:41+5:302022-10-09T18:05:03+5:30

Isha Sharvani : विवेक ओबेरॉयचा ‘किसना’ हा सिनेमा 2005 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातील एका चेहऱ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हा चेहरा होता ईशा शरवानीचा.

विवेक ओबेरॉयचा ‘किसना’ हा सिनेमा 2005 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातील एका चेहऱ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हा चेहरा होता ईशा शरवानीचा.

सुभाष घई यांनी एका डान्स शोमध्ये ईशाला पाहिलं आणि ऑडिशन न घेताच तिला ‘किसना’साठी सिलेक्ट केलं होतं. हृतिक रोशनसोबत एका जाहिरातीतही ती झळकली होती.

किसना या चित्रपटानंतर ती यू मी और हम, दरवाजा बंद रखो, लकी बाय चान्स, करीब करीब सिंगल या चित्रपटांत दिसली. मात्र यानंतर अचानक बॉलिवूडमधून गायब झाली.

‘किसना’ या चित्रपटातील ईशाच्या अभिनयाचं कौतुक झालं. मात्र यानंतर बॉलिवूडमध्ये तिला फार काही यश मिळालं नाही. आता ही ईशा कशी दिसते? काय करते? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

तर आजही ईशा तितकीच सुंदर दिसते. ईशाने शॉर्ट हेअरमधले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ईशा एक सिंगल मदर आहे. आपल्या मुलासोबत ती ऑस्ट्रेलियात राहते.

एकेकाळी ती क्रिकेटपटू जहीर खानसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. ईशा व जहीर दोघंही एकमेकांवर जिवापाड प्रेम करायचे. त्याचमुळे दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. पण दोघांचं नातं ‘निकाह’पर्यंत पोहोचू शकलं नाहीत.

दोघांची पहिली भेट 2005 मध्ये झाली होती. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरून परतणार होती. निरोप समारोहादरम्यान ईशाने एक धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता. जहीरने या कार्यक्रमात पहिल्यांदा ईशाला पाहिलं होतं. पण हे पहिल्या नजरेतले प्रेम नक्कीच नव्हतं. पुढे दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम.

2011 मध्ये वर्ल्ड कप दरम्यान ईशा व जहीर लग्न करणार, अशाही बातम्या आल्यात. पण अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली. पुढे जहीरने अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत लग्न केलं.

ब्रेकअप झाल्यानंतर ईशा प्रचंड दु:खी झाली होती. यातून सावरण्यास तिला बराच वेळ लागला. मी आजही जहीरला माझा चांगला मित्र मानते, असे ईशा एका मुलाखतीत म्हणाली होती.