'तेरे नाम'साठी 'या' अभिनेत्याला होती पहिली पसंती; त्याने नाकारला सिनेमा अन् सलमान झाला 'राधे'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 02:39 PM2023-08-17T14:39:33+5:302023-08-17T14:45:03+5:30

Salman khan: सलमानच्या करिअरमधील तेरे नाम हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमाची जादू आजही प्रेक्षकांवर आहे.

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान. आजवरच्या कारकिर्दीत सलमानने अनेक गाजलेले सिनेमा दिले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा होत असते.

हम दिल दे चुके सनम, हम आपके है कौन इथपासून ते दबंग, बजरंगी भाईजानपर्यंत त्याने असंख्य सिनेमांमध्ये काम केलं. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे तेरे नाम.

सलमानच्या करिअरमधील तेरे नाम हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमाची जादू आजही प्रेक्षकांवर आहे.

या सिनेमातील सलमानच्या अभिनयाची सर्वस्तरावर चर्चा झाली. परंतु, त्याच्यापूर्वी ही भूमिका ९० च्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्याला ऑफर करण्यात आली होती. परंतु, या अभिनेत्याने हा सिनेमा नाकारला.

तेरे नाम हा सिनेमा सलमानपूर्वी अभिनेता संजय कपूरला ऑफर करण्यात आला होता. परंतु, त्याने एका क्षुल्लक कारणामुळे हा सिनेमा नाकारला.

तेरे नाम हा सिनेमा प्रथम अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला होता. परंतु, सलमानसोबत वाद झाल्यामुळे अनुरागला हा सिनेमा सोडावा लागला. मात्र, ज्यावेळी अनुराग हा सिनेमा दिग्दर्शित करत होता त्यावेळी त्याने सगळ्यात प्रथम संजय कपूरला पसंती दिली होती.

या सिनेमा संजय असावा असं अनुरागला वाटत होतं. त्यासाठी त्याच्याशी चर्चाही झाली होती. परंतु, काही कारणास्तव संजयने हा सिनेमा नाकारला. संजयने सिनेमासाठी नकार दिला आणि त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. तर दुसरीकडे तेरे नाम बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला.

संजयने नकार दिल्यानंतर सलमानला तेरे नामची ऑफर मिळाली. या सिनेमामुळे सलमान पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला.

संजय कपूरने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमा दिले. परंतु, त्यानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागली.

तेरे नाम सोडल्यानंतर संजयचे अनेक सिनेमा फ्लॉप ठरले. तेव्हापासून तो कलाविश्वापासून दूर आहे. फार क्वचित वेळा तो एखाद्या सिनेमात दिसतो. अलिकडेच तो 'ब्लडी डॅडी' या चित्रपटात दिसला होता.