'परदेस'फेम अभिनेत्रीचा झाला होता विचित्र अपघात; तोंडातून काढले होते 67 काचेचे तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 09:38 AM2023-09-13T09:38:22+5:302023-09-13T09:43:56+5:30

Bollywood actress: सध्या ती सिंगल मदर म्हणून लेकीचा सांभाळ करतीये.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिचा गेल्या काही काळापासून कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र वरचेवर चाहत्यांमध्ये तिची चर्चा रंगते.

महिमा चौधरीचं प्रोफेशनल लाइफ जितकं चर्चेत राहिलं तितकंच तिचं प्रोफेशनल लाइफही चर्चेत आलं.

महिमा आणि टेनिसपटू लिएंडर पेस यांची लव्हस्टोरी त्या काळात विशेष गाजली. जवळपास ३ वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर २००३ मध्ये लिएंडर पेस मॉडेल रिया पिल्लई हिच्या प्रेमात पडला.

एकदा महिमाने रिया आणि लिएंडरला एकमेकांशी बोलताना रंगेहात पकडलं. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. महिमाने लिएंडरला सोडलं.

ब्रेकअपनंतर महिमाला स्वत:ला सावरणं फार कठीण झालं होतं. ब्रेकअपचं दु:ख सहन करत असतानाच २००६ मध्ये ती बॉबी मुखर्जीला भेटली. कोलकत्ताचा असलेला बॉबी आर्किटेक्ट होता.

महिमा आणि बॉबी एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लास वेगासमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये गपचूप साखरपुडा केला. त्यानंतर काही महिन्यातच महिमाचा बेबी बंप असलेला फोटो व्हायरल झाला.

२००७ मध्ये महिमाने एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर महिमा आणि बॉबी यांच्यात खटके उडू लागले. अखेर २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

सध्या महिमा सिंगल मदर म्हणून तिच्या लेकीचा सांभाळ करतीये.

दिल क्या करे या सिनेमावेळी महिमाचं करिअर पिकवर होतं. परंतु, १९९९ मध्ये तिचा मोठा अपघात झाला.

एका ट्रकने तिच्या गाडीला जोरात धडक दिली. या अपघातामध्ये महिमाच्या चेहऱ्यावर आणि तोंडात 67 काचेचे तुकडे शिरले होते. या काळात अजय देवगण आणि काजोल यांनी तिला खूप मदत केली होती.

या अपघातामधून महिमा बरी होत नाही त्यातच तिला कॅन्सरचं निदान झालं. मात्र, तिने या कर्करोगावरही यशस्वीरित्या मात केली.

महिमा बऱ्याच वर्षानंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. इमर्जन्सी या सिनेमात ती झळकणार आहे.