काजोलने नेसलेल्या या साडीची किंमत ऐकून बसेल धक्का, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 08:13 PM2023-12-22T20:13:04+5:302023-12-22T20:22:59+5:30

काजोल या साडीत अतिशय देखणी दिसत होती. मात्र या साडीची किंमत वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

काजोल ही एक सुंदर बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिने या इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

नुकतेच काजोल हिने प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

या शोमध्ये काजोलच्या साडीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

मोकळे सोडलेले स्ट्रेट केस काजोलला एक एलिगंट आणि मॅच्युअर लूक देत होते.

काजोलच्या चेहऱ्यावरचा ग्लो आणि तिच्या डोळ्यातले बोलके भाव यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली होती.

अतिशय डिसेंट आणि तरीही तितकीच उठावदार असलेली काजोलची ही साडी तिच्यावर अतिशय खुलून दिसत होती

काजोलच्या या साडीची किंमत ऐकल्यानंतर तुमचे डोळे पांढरे होतील. रिटेल प्लॅटफॉर्म अमेरिकाच्या अधिकृत साइटवर 1,20,200 रुपये इतकी साडीची किंमत आहे.

कधी वेस्टर्न, ट्रेडिशनल तर डिझाइनर साडी अशा वेगवेगळ्या अवतारात काजोल कायम पाहायला मिळते.