Harnaz kaur Sandhu : थरुर यांच्यासमवेतच्या व्हायरल ट्विटला हरनाजचा लय भारी रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 05:28 PM2021-12-16T17:28:55+5:302021-12-16T17:43:37+5:30

हरनाजनेही थरुर यांच्या ट्विटला उत्तर देत त्यांच्यासोबतची भेट सन्मानजक होती, असे म्हटले आहे.

पंजाबची कन्या हरनाज संधू (Harnaaz Sandhu)ने मिस युनिव्हर्स (Miss Universe)चा खिताब जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. 13 डिसेंबर 2021 हा ऐतिहासिक दिवस ठरला जेव्हा 21 वर्षांनी मिस युनिव्हर्सचा खिताब पुन्हा एकदा भारतात परत आला.

हरनाज सिंधूच्या आधी सुष्मिता सेन (1994) आणि लारा दत्ता (2000) यांनी हा खिताब जिंकला होता. त्यामुळे, हरनाजचे देशभरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

हरनाजने मिस युनिव्हर्स खिताब जिंकल्यानंतर आता माजी केंद्रीयमंत्री खासदार शशी थरुर यांच्यासमवेतच तिचा फोटो व्हायरल झाला आहे.

हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यापासून सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे. त्यातच, शशी थरुर यांनी तिच्यासोबत सेल्फी घेत एक फोटो शेअर केला आहे.

थरुर यांनी ट्विटरवरुन हरनाजचं अभिनंदनही केलंय. थरुर आणि हरनाज यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. नेटीझन्सने या फोटोवरुन थरुर यांना ट्रोल केलंय, तर काहींनी हटके सल्लाही दिला आहे.

थरुर यांनी हरनजाचे मायदेशी स्वागत असल्याचं म्हटलं. तसेच, हरनाजचे स्वागत करताना देशाला अभिमान वाटतो. ती मिस युनिव्हर्सच्या मंचावर जेवढी आकर्षक दिसत होती, तितकीच आकर्षक प्रत्यक्ष भेटल्यावरही दिसून आली, असे थरुर यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

त्यानंतर, अनेकांनी थरुर यांना ट्रोल केलंय. मैथमैटिसिअन नीना गुप्ता यांनी रामानुजन अवॉर्ड जिंकला आहे, त्यांना आपण शुभेच्छा दिल्या का?, असा सवाल एका युजरने केला.

हरनाजनेही थरुर यांच्या ट्विटला उत्तर देत त्यांच्यासोबतची भेट सन्मानजक होती, असे म्हटले आहे.

सर, आपणास भेटणं ही सन्मानजनक बाब आहे, एक व्यक्ती म्हणून आपली भेट ही अभिमानास्पद आहे. आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद, असा रिप्लाय हरनाज कौर संधूने शशी थरुर यांच्या ट्विटला दिला आहे.