बोमन इराणीचा थोरला लेक आहे प्रसिद्ध दिग्दर्शक; 'स्टुडंट ऑफ द इअर'साठी केलंय काम

By ओमकार संकपाळ | Published: July 8, 2022 12:36 PM2022-07-08T12:36:56+5:302022-07-08T12:41:40+5:30

Kayoze irani: कायोजने 'स्टूडेंट ऑफ द इअर', 'अजीब दास्तान', 'द लीजेंड ऑफ माइकल मिश्रा', 'यंगिस्तान' यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे.

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या यादीत अभिनेता बोमन इराणी यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

'मुन्ना भाई एम बी बी एस', '3 इडियट्स', 'लगे रहो मुन्ना भाई', 'डॉन 2', 'रनवे' अशा कितीतरी चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे.

त्यांची '3 इडियट्स'मधील वायरस ही भूमिका विशेष गाजली. या चित्रपटामुळे रातोरात त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली.

बोमन इराणी यांच्याप्रमाणेच त्यांचा थोरला लेकही कलाविश्वात सक्रीय असून तो प्रसिद्ध दिग्दर्शक आहे.

बोमन इराणी यांना दोन मुलं आहेत. त्यातील थोरला लेकल कायोज इराणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे.

कायोज बऱ्यापैकी आपल्या वडिलांप्रमाणे म्हणजे बोमन इराणी यांच्याप्रमाणे दिसतो.

कायोजने 'स्टूडेंट ऑफ द इअर', 'अजीब दास्तान', 'द लीजेंड ऑफ माइकल मिश्रा', 'यंगिस्तान' यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे.

कायोज सोशल मीडियावर सक्रीय असून त्याने बोमन यांच्यासोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. यात काही सेटवरील आहेत. तर, काही घरातील कार्यक्रमांमधील.