कादर खान यांच्या निधनामुळे देशभर शोककळा! अनेकांनी वाहिली श्रद्धांजली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 03:25 PM2019-01-01T15:25:32+5:302019-01-01T15:33:16+5:30

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते व पटकथा लेखक कादर खान यांनी काल ३१ डिसेंबरला कॅनडात अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह देशभर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी, अभिनेते अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अनिल कपूर आदींनी कादर खान यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद मोदींनी टिष्ट्वटरवर कादर खान यांना श्रद्धांजली अर्पण केली. कादर खान यांनी आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने मी दु:खी आहे. त्यांच्या कुटुंबाप्रति सांत्वना, असे त्यांनी लिहिले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या. कादर खान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले, असे त्यांनी लिहिले.

कादर खान आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनाची बातमी दु:खद व निराशाजनक आहे, असे अमिताभ बच्चन यांनी लिहिले.

कादर खान यांच्याकडून मी खूप काही शिकलो. त्यांच्यासोबतच्या असंख्य आठवणी आहेत, असे अनुपम खेर यांनी लिहिले.

कादर खान कायम आपल्या मनात राहतील, अशा शब्दांत अनिल कपूर यांनी कादर खान यांना श्रद्धांजली वाहिली.

वरूण धवननेही कादर खान यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.

दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनीही कादर खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

एक महान अभिनेता, लेखक आपण गमावला, अशा शब्दांत अर्जुन कपूरने दु:ख व्यक्त केले.