अंडरवर्ल्डला नमवणारी अभिनेत्री! एकेकाळी राणी अन् ऐश्वर्यावर पडलेली भारी, आता काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:39 IST2026-01-30T15:56:53+5:302026-01-30T16:39:09+5:30

बॉलिवूडची ब्यूटी क्वीन थेट अंडरवर्ल्डसोबत भिडलेली, धुडकावली ६०० कोटींची ऑफर, आता क्रीडाविश्वात आहे दबदबा

बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रीती झिंटा.अभिनेत्रीने तिच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

प्रीती झिंटाने 'दिल से' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.'कल हो ना हो', 'कभी अलविदा ना कहना', 'कोई मिल गया', 'सलाम नमस्ते' यासारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.

प्रितीची कारकीर्द यशस्वी झाली असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती प्रचंड चर्चेत राहिली. ३१ जानेवारीला अभिनेत्री तिचा ५१ वा वाढदिवस साजरा करते आहे.

भारतीय लष्करातील अधिकारी दुर्गानंद झिंटा यांच्या घरी जन्मलेल्या प्रीती झिंटाचं बालपण फार हालअपेष्टांमध्ये गेलं. १३ वर्षींची असताना ती वडिलांच्या मायेला पोरकी झाली. वडील दुर्गानंद झिंटा यांचे कार अपघातात निधन झाले. त्यादरम्यान तिची आई नीलप्रभा एका कार अपघातात गंभीर जखमी झाल्या आणि अंथरुणाला खिळून राहिल्या.

लहान वयातच जबाबदारीचं ओझं तिच्या खांद्यावर आलं. प्रीतीने आई-वडिलांच्या निधनानंतर शिमला येथील सेंट बेडेज कॉलेजमध्ये इंग्रजी ऑनर्स आणि क्रिमिनल सायकॉलॉजीचं शिक्षण घेतलं.

पण नशिबाने ती या क्षेत्रात आली. एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून, अभिनेत्रीने एका साबणाच्या जाहिरातीत काम केलं, या जाहिरातीमधून तिने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. यानंतर प्रीती झिंटाला शाहरुख खानचा 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता, पण काही कारणास्तव ती या चित्रपटाचा भाग होऊ शकली नाही.

२००३ मध्ये आणखी एका कारणामुळे प्रीती झिंटा चर्चेत आली होती. तिने अंडरवर्ल्डला विरोध करण्याचे धाडस दाखवले होते. यामध्ये ६०० कोटी रुपयांची संपत्ती नाकारपण्यापासून थेट छोटा शकीलशी पंगा घेण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.मात्र, यशाच्या शिखरावर असताना तिने इंडस्ट्रीतून काढता पाय घेतला आणि ती व्यवसाय क्षेत्रात उतरली.२००८ मध्ये,प्रीती झिंटाने आयपीएल टीम पंजाब किंग्जची सह-मालक बनली.

एकेकाळी ही अभिनेत्री राणी मुखर्जी आणि ऐश्वर्या रायच्या स्टारडमला टक्कर द्यायची. प्रिती झिंटाने २०१६ साली अमेरिकेतील फायनान्स अॅनालिस्ट जीन गुडइनफसोबत लग्न केलं. पाच वर्षांनंतर तिला सरोगसीच्या माध्यमातून जुळी मुलं झाली. त्यांचं नाव जय आणि जिया असं आहे.