Ranbir-Alia Wedding : रणबीर-आलियाच्या लग्नविधींना सुरुवात; ट्रेडिशनल लूकमध्ये मेहंदीसाठी पोहोचल्या करिश्मा, करिना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 03:45 PM2022-04-13T15:45:38+5:302022-04-13T16:07:48+5:30

Alia Bhatt Ranbir Kapoor Pre Wedding Function : आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झालीये. होय, लग्नाच्या तारखेबद्दल संभ्रम असला तरी 14 ते 17 एप्रिल यादरम्यान हे कपल लग्न करतंय, हे नक्की.

आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झालीये. होय, लग्नाच्या तारखेबद्दल संभ्रम असला तरी 14 ते 17 एप्रिल यादरम्यान हे कपल लग्न करतंय, हे नक्की.

कपूर वा भट कुटुंबाने अद्याप लग्नाची अधिकृत तारीख जाहिर केलेली नाही. पण आजपासून लग्नाच्या विधींना सुरूवात झालीये. मेहंदी फंक्शनने विधींना सुरूवात झाली. यानिमित्त कपूर कुटुंब व अनेक सेलिब्रिटी प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सामील झालेत.

आज प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी अख्खं कपूर कुटुंब एकत्र जमलं. रणबीर कपूरची आई नीतू कपूर आपली नात, आणि मुलगी रिद्धिमासोबत मुलाच्या घरी पोहोचली. या फोटोमध्ये त्या पोपटी रंगाच्या एम्ब्रॉयडरी सूटमध्ये दिसत आहेत.

पापाराझी सतत नीतू कपूर यांना लग्नाबद्दल विचारत होते. परंतु नीतू मात्र या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून होत्या. आज नीतू गाडीतून मीडियासमोर हात जोडून अभिवादन करताना दिसून आल्या.

करिश्मा कपूरही यावेळी दिसली. ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये ती चुलत भावाच्या मेहंदी सेलिब्रेशनमध्ये सामील झाली.

करिना कपूर व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. व्हाईट लहेंग्यामध्ये तिने जबरदस्त एन्ट्री घेतली.

करण जोहर, अयान मुखर्जी हे रणबीर व आलियाचे सर्वात जवळचे मित्र यांनीही आलिया व रणबीरच्या मेहंदी फंक्शनला हजेरी लावली.

रणबीरची आत्त्या रीमा जैनही लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रणबीरच्या घरी पोहोचल्या.

रणबीरचा कझिन अरमान जैन हाही यावेळी दिसला. तो सुद्धा रणबीर व आलियाच्या आनंदात सहभागी झाला. रणबीर व आलियाच्या लग्नात कडक सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळतेय. ठिकठिकाणी 200 बाऊंसर्स तैनात करण्यात आले आहेत.

आलियाचे वडील महेश भट यांनी लेकीच्या मेहंदी फंक्शनमध्ये अशी झक्कास एन्ट्री घेतली. यावेळी आलियाची सावत्र बहिण पूजा भट खूप आनंदी दिसत होती.