३ अफेयर, लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिली होती ही ४३ वर्षीय अभिनेत्री, पालकांच्या ताकीदनंतर घाईघाईत उरकलं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 04:05 PM2023-12-14T16:05:15+5:302023-12-14T16:23:47+5:30

२०१८ साली या अभिनेत्रीने बॉलिवूडच्या अभिनेत्यासोबत लग्न केले आणि त्याच वर्षी तिने मुलीला जन्म दिला.

नेहा धुपिया ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 'कयामत : सिटी अंडर थ्रेट', 'दे दनादन' ते 'चुप चुप के' सारख्या चित्रपटात काम केले आहे. मात्र, नेहा तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली.

अंगद बेदीसोबत सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद लुटणारी नेहा धुपिया एकेकाळी तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. नेहाने अचानक अंगद बेदीशी लग्न करण्याचा विचार केला होता, ज्याचे कारण आधी समोर आले नाही, पण जेव्हा हे समोर आले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

नेहा धुपियाने २०१८ मध्ये अंगद बेदीशी गुपचूप लग्न केले आणि त्याच वर्षी त्यांची मुलगी मेहर बेदीचाही जन्म झाला. नेहाने प्रेग्नन्सीमुळे लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले होते.

नेहाने एका मुलाखतीत लग्नाआधी प्रेग्नंट झाल्याबद्दल सांगितले होते आणि यावर तिच्या पालकांची प्रतिक्रिया काय होती हे सांगितले होते. नेहाने टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की 'आमचे लग्न कोणत्याही तयारीशिवाय झाले.'

नेहाने सांगितले होते की, 'मी लग्नाआधीच प्रेग्नंट झाले होते आणि जेव्हा मला हे कळले तेव्हा मी माझ्या पालकांना याची माहिती दिली. ते मला म्हणाले, छान आहे पण तुझ्याकडे लग्नासाठी फक्त ७२ तास आहेत.

'लग्नासाठी त्यांनी मला फक्त अडीच दिवस दिले. आई-वडिलांच्या सल्ल्यानुसार मी मुंबईला पोहोचताच अंगदशी लग्न केले. जर तुमच्या निर्णयाने कोणाचे नुकसान होत नसेल तर तुम्हाला जे करायचे आहे ते करण्यात काही नुकसान नाही.

नेहा धुपियाने २०१८ मध्ये अंगद बेदीशी लग्न केले आणि लग्नानंतर लगेचच तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली.

नेहाने मे महिन्यात लग्न केले आणि नोव्हेंबरमध्ये मुलगी मेहरला जन्म दिला, ज्यासाठी तिला खूप ट्रोल देखील केले गेले. मात्र, 'चार लोक काय म्हणतात' याने तिला काही फरक पडत नाही, हे या अभिनेत्रीने अनेकदा सिद्ध केले आहे.