आलिया भट्ट, नेहा धुपिया ते श्रीदेवी! लग्नाआधीच प्रेग्नंट होत्या बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री, एकीने लग्न न करताच दिला मुलीला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:40 IST2026-04-29T14:36:56+5:302026-04-29T14:40:18+5:30
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती. पण, त्यामुळेच तिने अंगद बेदीशी लग्न करण्यास होकार दिला.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती. पण, त्यामुळेच तिने अंगद बेदीशी लग्न करण्यास होकार दिला.

नेहा धुपियाने १० मे २०१८ रोजी अंगद बेदीशी लग्न केलं. त्यानंतर काही महिन्यांतच नोव्हेंबरमध्ये तिने मेहेर या त्यांच्या मुलीला जन्म दिला.

नेहा धुपियाप्रमाणेच आलिया भट्टही लग्नाआधी गरोदर असल्याच्या चर्चा होत्या. रणबीरशी लग्न केल्यानंतर आलियाने ७ महिन्यांतच राहाला जन्म दिला होता.

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीने जून १९९६मध्ये बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांना जान्हवी कपूर ही मुलगी झाली. बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं तेव्हा श्रीदेवी गरोदर होती, अशी चर्चा होती.

अभिनेता रणवीर शौरीशी लग्न केलं तेव्हा कोंकणा सेन शर्मा गरोदर होती. त्यांना एक मुलगा आहे. मात्र १० वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले.

बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोविचने लॉकडाऊनमध्ये हार्दिक पांड्यासोबत लग्न केलं होतं. तेव्हा ती गरोदर होती. गेल्याच वर्षी त्यांचा घटस्फोट झाला असून त्यांना अगस्त्य हा मुलगा आहे.

नीना गुप्ता यांच्या प्रेग्नंसीची प्रचंड चर्चा होती. विवियन रिचर्डसोबत त्यांचं रिलेशनशिप होतं. लग्न न करताच त्यांनी मसाबाला जन्म दिला आणि तिचा सांभाळ केला.

















