दिग्गज अभिनेत्याच्या मुलीने नावात केला बदल, बॉलिवूड सिनेमासाठी तृप्तीची झाली 'आएशा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 10:16 IST2023-04-09T10:14:21+5:302023-04-09T10:16:57+5:30

'आदिपुरुष' सिनेमात आएशाची वर्णी लागली आहे.

Veteran actor madhukar toradmal daughter changed her name adopted the name Ayesha for Bollywood movie | दिग्गज अभिनेत्याच्या मुलीने नावात केला बदल, बॉलिवूड सिनेमासाठी तृप्तीची झाली 'आएशा'

दिग्गज अभिनेत्याच्या मुलीने नावात केला बदल, बॉलिवूड सिनेमासाठी तृप्तीची झाली 'आएशा'

मराठी नाट्यसृष्टीत ज्यांना 'मामा' म्हणून ओळखले जायचे ते दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल (Madhukar Toradmal). अनेक विविधांगी नाटकातून त्यांनी मराठी नाट्यसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहेत. मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती तोरडमल (Trupti Toradmal) लवकरच ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या सिनेमात झळकणार आहे. पण तुम्हाला माहितीए का बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी तिने चक्क आपलं 'तृप्ती' हे नाव बदलून 'आएशा मधुकर तोरडमल' (Ayesha Madhukar) असं केलं आहे.

होय. आता तृप्ती तोरडमल नव्हे तर आएशा तोरडमल असं तिचं नाव आहे. गेल्या वर्षीच तिने नावात बदल केला आहे. सोशल मीडियावरही तिने आएशा मधुकर असंच नाव लिहिलं आहे. सुबोध भावेच्या 'सविता दामोदर परांजपे' सिनेमात आएशाने मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली. आज तिचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र नावात बदल केल्याने तिच्यावर टीकाही होत आहे. 

अभिनेत्री आएशाने स्वत: यावर उत्तर सांगितलं,' माझ्या जन्मपत्रिकेत माझं नाव आएशा आहे. जेव्हा सविता दामोदर परांजपे सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा मला नावात बदल करता आला नाही. पण आता माझा बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित होतआहे म्हणून नावात बदल करण्याचा निर्णय घेतलाय.'

आएशा सोशल मीडियावर अनेक फोटो अपलोड करत असते. तिच्या बोल्ड फोटोंची कायम चर्चा असते. नुकतेच तिने 'फुलराणी' या सिनेमाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. सध्या ती बॉलिवूड पदार्पणालासाठी उत्सुक असल्याचं दिसून येतंय.

Web Title: Veteran actor madhukar toradmal daughter changed her name adopted the name Ayesha for Bollywood movie