"विश्वास बसत नाहीय की.."; आयुष्यातला पहिला फिल्मफेअर मिळाल्याने प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 09:39 IST2024-04-19T09:38:10+5:302024-04-19T09:39:19+5:30

प्रियदर्शनी इंदलकरला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याने तिने खास पोस्ट करुन आनंद व्यक्त केलाय. यानिमित्त सर्वांनी प्रियदर्शनीचं अभिनंदन केलंय. (priyadarshini indalkar, filmfare)

Priyadarshini indalkar got first filmfare award for her film phulrani | "विश्वास बसत नाहीय की.."; आयुष्यातला पहिला फिल्मफेअर मिळाल्याने प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण

"विश्वास बसत नाहीय की.."; आयुष्यातला पहिला फिल्मफेअर मिळाल्याने प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्रियदर्शनीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून सर्वांचं मनोरंजन केलंच. शिवाय विविध सिनेमा आणि वेबसिरीजमधूनही प्रियदर्शनी चमकली. प्रत्येक माध्यमांत प्रियदर्शनीने चांगला अभिनय करत लोकांचं प्रेम मिळवलं. प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण आलंय. कारण तिला तिच्या आयुष्यातला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळालाय. यानिमित्त पोस्ट करुन तिने तिचा आनंद व्यक्त केलाय.

प्रियदर्शनीने हातात फिल्मफेअर ट्रॉफीचे फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "खुप सुंदर असलेली फिल्मफेअरची एक रात्र. सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीसाठी मला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मला अजुनही विश्वास बसत नाहीय. माझ्या या प्रवासात जे कोणी सोबत होते त्या सर्वांना धन्यवाद. माझे मित्र, कुटुंब, खास मित्र, सहकारी, निर्माते, मार्गदर्शक आणि सर्वांना धन्यवाद. अशीच नवनवीन निर्मिती करुया. एकमेकांना प्रोत्साहन देत जादू घडवूया."

'फुलराणी' या मराठी सिनेमासाठी प्रियदर्शनीला बेस्ट डेब्यू अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 'फुलराणी' सिनेमात प्रियदर्शनीसोबत अभिनेता सुबोध भावेची प्रमुख भूमिका होती. या सिनेमातले संवाद, प्रियदर्शनीचा अभिनय याची बरीच चर्चा झाली. प्रियदर्शनीची प्रमुख भूमिका म्हणून हा सिनेमा गाजला. बॉक्स ऑफीसवर सिनेमाने संमिश्र कामगिरी केली. तुम्ही हा सिनेमा प्राईम व्हिडीओवर बघू शकता. दरम्यान या सिनेमासाठी फिल्मफेअर मिळाल्याबद्दल अनेकांनी प्रियदर्शनीचं अभिनंदन केलंय.

Web Title: Priyadarshini indalkar got first filmfare award for her film phulrani