"...तर मी अजितदादांवर बायोपिक करेन", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले- "धर्मवीरनंतर..."

By कोमल खांबे | Updated: May 15, 2026 12:42 IST2026-05-15T12:41:34+5:302026-05-15T12:42:25+5:30

'धर्मवीर'नंतर आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्यावर बायोपिक करण्याची इच्छा प्रवीण तरडेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखीत बोलून दाखवली आहे. 

pravin tarde expressed wish to make biopic on ajit pawar after dharmveer | "...तर मी अजितदादांवर बायोपिक करेन", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले- "धर्मवीरनंतर..."

"...तर मी अजितदादांवर बायोपिक करेन", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले- "धर्मवीरनंतर..."

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक प्रवीण तरडे 'देऊळ बंद २' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'धर्मवीर' सिनेमाही हिट झाला होता. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला. आनंद दिघे यांच्यावरील या बायोपिकला चाहत्यांनी पसंती दर्शवली होती. 'धर्मवीर'नंतर आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्यावर बायोपिक करण्याची इच्छा प्रवीण तरडेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखीत बोलून दाखवली आहे. 

प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'च्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, "मी दोन वर्षात एकच सिनेमा करतो. 'मुळशी पॅटर्न'नंतर मला खूप ऑफर आल्या होत्या. खूप लोक माझ्याकडे सिनेमा बनवण्यासाठी पैसे घेऊन आले होते. असे कितीतरी लोक मी परत पाठवले आहेत. धर्मवीरनंतरही राजकारणातील खूप लोक आले होते. दिघे साहेबांवर जसा सिनेमा झाला तसा आमच्या नेत्यावर तुम्हीच सिनेमा बनवा. पण मी नाही केलं. आता जर कधी बायोपिक केलं तर मी अजितदादांवर करेन. कारण, त्यांना मी जवळून ओळखत होतो. त्यांच्यासोबत माझा संपर्क होता. आणि त्यांचं आयुष्यही तसं होतं". 


"अजितदादा सकाळी ६.३० वाजता मंत्रालयात हजर राहणारे मंत्री होते. मंत्रालयाच्या पायऱ्याही त्यांना मिस करत असतील. आजही त्या पायऱ्या म्हणत असतील ती पावलं कुठे गेली. सकाळी ६.३० वाजता मंत्रालयात हजर राहणारा मंत्री आपण गमावला. दिघे साहेबांवर सिनेमा केल्यानंतर मी कोणावर सिनेमा करायचा नाही, असं ठरवलं होतं. पण, अजितदादांचं कार्य तसं आहे", असंही प्रवीण तरडेंनी पुढे सांगितलं. 

दरम्यान, प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' सिनेमा येत्या २१ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर विषयावर या सिनेमातून भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमात मोहन जोशी, स्नेहल तरडे, प्रसाद ओक, ओम भुतकर, महेश मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Web Title : प्रवीण तरडे अजित पवार पर बायोपिक बनाना चाहते हैं।

Web Summary : निर्देशक प्रवीण तरडे 'धर्मवीर' के बाद अजित पवार पर बायोपिक बनाना चाहते हैं। उन्होंने पवार की कर्तव्यनिष्ठा की प्रशंसा की, मंत्रालय में उनकी सुबह की उपस्थिति को याद किया। तरडे की फिल्म 'देऊळ बंद 2', जो किसान आत्महत्याओं को संबोधित करती है, 21 मई को रिलीज होगी, जिसमें मोहन जोशी और अन्य कलाकार हैं।

Web Title : Pravin Tarde wants to make a biopic on Ajit Pawar.

Web Summary : Director Pravin Tarde, after 'Dharmaveer,' expresses his desire to create a biopic on Ajit Pawar. He admires Pawar's dedication, recalling his early morning presence at the ministry. Tarde's film 'Deul Band 2,' addressing farmer suicides, releases on May 21, starring Mohan Joshi and others.