एकुलत्या एक लेकाच्या वाढदिवशी निवेदिता सराफ यांची पोस्ट; "तू मला खूप काही शिकवलंस" म्हणत व्यक्त केलं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:43 IST2026-04-21T13:41:50+5:302026-04-21T13:43:55+5:30

निवेदिता सराफ यांनी मुलगा अनिकेत सराफच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर करत त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं.

Nivedita Saraf Post Son Aniket Saraf Birthday Chef Career | Ashok Saraf Family | एकुलत्या एक लेकाच्या वाढदिवशी निवेदिता सराफ यांची पोस्ट; "तू मला खूप काही शिकवलंस" म्हणत व्यक्त केलं प्रेम

एकुलत्या एक लेकाच्या वाढदिवशी निवेदिता सराफ यांची पोस्ट; "तू मला खूप काही शिकवलंस" म्हणत व्यक्त केलं प्रेम

Nivedita Saraf Post for Son Aniket Birthday : अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. त्या दोघांनी सिनेसृष्टीत विविधांगी भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.  या जोडप्याला एक मुलगा आहे, अनिकेत सराफ. आज त्याचा वाढदिवस आहे. आपल्या  एकुलत्या एका लेकाच्या वाढदिवशी निवेदिता यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

निवेदिता सराफ यांनी अनिकेतसोबतचा एक गोड फोटो  शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहलं, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या प्रिय अनिकेत! तुझं येणारं वर्ष खूप सुंदर जावो आणि तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवोत, हीच देवाकडे प्रार्थना".

पुढे लेकाचं कौतुक करत त्या म्हणाल्या, "तू आयुष्यात कधीच सोपा मार्ग निवडला नाहीस, जे काही मिळवलंस ते स्वतःच्या मेहनतीने मिळवलंस, याचा मला खूप अभिमान आहे. मी तुझी आई असले तरी तू मला खूप काही शिकवलंस. खूप खूप प्रेम माझ्या लाडक्या!", या शब्दात त्यांनी लेकावरील प्रेम व्यक्त केलं. त्यांच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. 


निवेदिता-अशोक सराफ यांचा मुलगा काय करतो?

अनिकेत सराफ सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे. त्यानं अभिनयाची वाट न निवडता त्यानं वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तो परदेशात शेफ म्हणून करिअर करतोय. त्याला विविध पदार्थ बनवण्याची सुरुवातीपासूनच आवड होती. आपली आवड लक्षात घेऊन त्याने आपले करिअर बनवलं आहे. त्याचं शिक्षण फ्रान्समध्ये झालंय. तो भारतीय आणि पाश्चिमात्य दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवतो. 

Web Title : निवेदिता सराफ ने बेटे के जन्मदिन पर प्यार भरा संदेश दिया।

Web Summary : निवेदिता सराफ ने बेटे अनिकेत को जन्मदिन की बधाई दी, उनकी मेहनत की सराहना की और कहा कि उन्होंने उन्हें बहुत कुछ सिखाया। अनिकेत फ्रांस में प्रशिक्षित शेफ हैं, जो फिल्म उद्योग से दूर अपना करियर बना रहे हैं।

Web Title : Nivedita Saraf's heartfelt birthday wish for her only son.

Web Summary : Nivedita Saraf posted a birthday wish for her son Aniket, praising his hard work and saying he taught her a lot. Aniket is a chef trained in France, pursuing his passion away from the film industry.