Video: सुव्रतने गोव्याच्या घरी जात दिलं सरप्राईज, अभिनेत्याच्या आईची क्यूट रिॲक्शन एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 04:37 PM2024-03-11T16:37:11+5:302024-03-11T16:37:40+5:30

दरवाजा वाजवत त्याने जोशी काकू आहेत का असे विचारले. आतून आले, आले असा आवाज आला. सुव्रतची आई आत या असं म्हणत बाहेर आली.

marathi actor Suvrat Joshi gave surprise to his mother went to hometown his mother s reaction is going viral | Video: सुव्रतने गोव्याच्या घरी जात दिलं सरप्राईज, अभिनेत्याच्या आईची क्यूट रिॲक्शन एकदा पाहाच

Video: सुव्रतने गोव्याच्या घरी जात दिलं सरप्राईज, अभिनेत्याच्या आईची क्यूट रिॲक्शन एकदा पाहाच

अभिनेता सुव्रत जोशी (Suvrat Joshi) 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचला. त्याची भूमिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडली. सुव्रतने नुकतीच सुष्मिता सेनच्या 'ताली' वेब सीरिजमध्ये तृतीयपंथियाची भूमिका साकारली. शिवाय त्याने काही नाटकातही काम केले. सुव्रत नेहमी सोशल मीडियावर काही ना काही हटके पोस्ट करत असतो. नुकतंच त्याने गोव्यातील त्याच्या घरी जात आई आणि आजीला सरप्राईज दिलं. तेव्हा त्याच्या आईची रिअॅक्शन काही औरच होती.

सुव्रत मुंबईत राहत असला तरी त्याचं घर गोव्यात आहे. तिकडे त्याची आई आणि आजी आहेत. शूट आणि व्यस्त वेळापत्रकामुळे सुव्रतला घरी जाणं शक्य होत नाही. मात्र यावेळी त्याने आईच्या वाढदिवसाला तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं. तो कारने मुंबईवरुन गोवा बॉर्डरवर असलेल्या घरी गेला. दरवाजा वाजवत त्याने जोशी काकू आहेत का असे विचारले. आतून आले, आले असा आवाज आला. सुव्रतची आई आत या असं म्हणत बाहेर आली. पण समोर आपल्या मुलाला पाहून तिला सुखद धक्काच बसला. ती थेट जमिनीवरच बसली. सुव्रतच्या आईची ही रिअॅक्शन पाहून कमेंट्समध्ये सगळ्यांनीच 'किती गोड' म्हटलं आहे.

सुव्रतने व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, 'परवा मी आईला तिच्या वाढदिवसाला सरप्राईज द्यायचं ठरवलं. मी गोवा बॉर्डरवरील आमच्या घरी गेलो. साडेदहा तासांचं ड्राईव्ह आणि झी गौरवच्या शूटिंगमुळे दोनच तासांची झोप घेऊन गेलो ते फक्त आईची ही रिएक्शन पाहण्यासाठी. महिला दिनाला माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट महिलेचा व्हिडिओ शेअर करत आहे. आता तुम्हाला कळेल की आमच्या कुटुंबातच किती ड्रामा आहे.'

सुव्रतने २०१९ साली अभिनेत्री सखी गोखलेसोबत लग्नगाठ बांधली. सखीच्या शिक्षणासाठी दोघंही काही वर्ष लंडनमध्ये होते. सुव्रतने 'गोष्ट एका पैठणीची' मध्येही भूमिका साकारली. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

Web Title: marathi actor Suvrat Joshi gave surprise to his mother went to hometown his mother s reaction is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.