अखेर समोर आली 'छापा काटा'ची रिलीज डेट; 'या' दिवशी मकरंद अनासपुरे करणार बॉक्स ऑफिसवर कल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 12:32 PM2023-12-12T12:32:59+5:302023-12-12T12:34:01+5:30

Chhapa Kata: 'छापा काटा' या आगामी सिनेमातून मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी ही जोडी बऱ्याच वर्षांनी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे.

marathi actor makarand anaspure upcoming movie Chhapa Kata release date out | अखेर समोर आली 'छापा काटा'ची रिलीज डेट; 'या' दिवशी मकरंद अनासपुरे करणार बॉक्स ऑफिसवर कल्ला

अखेर समोर आली 'छापा काटा'ची रिलीज डेट; 'या' दिवशी मकरंद अनासपुरे करणार बॉक्स ऑफिसवर कल्ला

दर्जेदार अभिनयशैली आणि विनोदकौशल्य यांच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणारा अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे (makarand anaspure). आजवरच्या कारकिर्दीत मकरंद यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. त्यामुळे मराठी कलाविश्वात त्यांचं नाव आदरानेच घेतलं जातं. आतापर्यंत असंख्य सिनेमा करणारे मकरंद अनासपुरे लवकरच 'छापा काटा' या नव्या कोऱ्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वीच या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.

'छापा काटा' या आगामी सिनेमातून मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी (tejaswini lonari) ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. यापूर्वी या जोडीने दोघात तिसरा आता सगळं विसरा या सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर ही जोडी फारशी कुठे एकत्र आली नाही. मात्र, छापा-काटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ते एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे रुपेरी पडद्यावर या जोडीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

लोकांना वेड्यात काढून पॉलिसी विकणारा करामती नाम्या बहिणीच्या लग्नासाठी श्रीमंत शनायाशी लग्नाचा करार करतो. पण हा नकली लग्नाचा करार नाम्या आणि शनायाच्या कुटुंबात काय धमाल विनोदी गोंधळ घालणार आणि त्या कराराचं पुढे काय होणार हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचं अलिकडेच पोस्टर आणि ट्रेलर लॉन्च झालं. त्यानंतर आता सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. ‘छापा काटा’  हा सिनेमा येत्या१५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. 

दरम्यान,  या सिनेमात मकरंद अनासपुरेने नाम्या ही भूमिका साकारली आहे. तर, शनायाची भूमिका तेजस्विनी लोणारी साकारत आहे. या दोडीसोबत या सिनेमात मोहन जोशी (mohan joshi), अरुण नलावडे (arun nalawde), ऋतुराज फडके, पंकज विष्णु (pankaj vishnu), सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर (vijay patkar) या दिग्गज कलाकार मंडळी दिसून येणार आहेत.

Web Title: marathi actor makarand anaspure upcoming movie Chhapa Kata release date out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.