जोडी जमली! मकरंद अनासपुरेंसोबत तेजस्विनीचा 6 वा चित्रपट; म्हणाली, 'माझे गुरु...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 08:37 AM2023-04-09T08:37:42+5:302023-04-09T08:39:13+5:30

तेजस्विनीने मकरंद अनासपुरेंसोबत याआधी ५ सुपरहिट सिनेमे केले आहेत.

makrand anaspure and tejaswini lonari coming together in next film | जोडी जमली! मकरंद अनासपुरेंसोबत तेजस्विनीचा 6 वा चित्रपट; म्हणाली, 'माझे गुरु...'

जोडी जमली! मकरंद अनासपुरेंसोबत तेजस्विनीचा 6 वा चित्रपट; म्हणाली, 'माझे गुरु...'

googlenewsNext

आपल्या विनोदी अभिनयाने मराठी सिनेसृष्टीवर राज्य करणारे अभिनेते मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) आणि 'बिग बॉस' फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) यांची जोडी पुन्हा जमली आहे. दोघांनी आतापर्यंत पाच चित्रपटात एकत्र काम केले आहे. सुपरहिट सिनेमे दिले आहेत. आता यांची जोडी पुन्हा प्रेक्षकांनी हसवायला येत आहे. तेजस्विनीने गुरु मकरंद अनासपुरे यांच्यासोबत ६ वा धमाकेदार चित्रपट म्हणत पोस्ट शेअर केली आहे. 

'बिग बॉस' फेम तेजस्विनी लोणारी बऱ्याच काळापासून मोठया पडद्यावरुन गायबच होती. काही काळ तिने अभिनयातून ब्रेक घेतला होता.बिग बॉसमधून ती पुन्हा प्रेक्षकांच्या नजरेसमोर आली. त्यातही ती सर्वांची लाडकी बनली होती. आता तेजस्विनी आणि मकरंद अनासपुरे पुन्हा धमाकेदार चित्रपट घेऊन येणार म्हणल्यावर चाहतेही उत्सुक आहेत. तेजस्विनीने पोस्ट शेअर करत लिहिले, 'वयाच्या सोळाव्या वर्षांपासुन मला जे गुरु आणि सहकलाकार म्हणून लाभलेले Makarand Anaspure sir , ज्यांच्याबरोबर पाच चित्रपट करण्याचा योग आला आणि त्या चित्रपटांमुळे जी प्रसिद्धी मिळाली आता हीच जोडी तुमच्यासाठी घेऊन येत आहे 6th from the Instalment…धमाकेदार चित्रपट....Stay Tuned'

हिरवी साडी, हातात हिरव्या बांगड्या आणि मुंडावळ्या बांधून तेजस्विनी नवरीच्या भूमिकेत खूपच सुंदर दिसत आहे. तर मकरंद अनासपुरे क्रीम रंगाच्या शेरवानीत एव्हरग्रीन दिसत आहेत. तेजस्विनी मकरंद अनासपुरेंना गुरु म्हणते. वयाच्या १६ व्या वर्षापासूनच तिने त्यांच्यासोबत काम केले आहे.
 
'दोघात तिसरा आता सगळं विसरा','बाप रे बाप डोक्याला ताप','नो प्रॉब्लेम','गुलदस्ता','बायको नंबर 1' या ५ चित्रपटात एकत्र काम केले आहे. आता यांचा ६ वा सिनेमा कोणता यासाठी चाहत्यांना थोडी वाट बघावी लागणार आहे.

Web Title: makrand anaspure and tejaswini lonari coming together in next film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.