भारत पॅव्हेलियन येथे अभिजात मराठी OTT चे जागतिक लाँच; अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळीची खास उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 11:13 IST2026-05-18T11:07:07+5:302026-05-18T11:13:13+5:30

१६ मे रोजी सायंकाळी कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील भारत पॅव्हेलियन येथे आयोजित अभिजात मराठी OTT च्या जागतिक लाँच कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.

Global launch of Abhijat Marathi OTT at Bharat Pavilion cannes 2026 Ashok Saraf Nivedita Saraf Prajakta Mali | भारत पॅव्हेलियन येथे अभिजात मराठी OTT चे जागतिक लाँच; अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळीची खास उपस्थिती

भारत पॅव्हेलियन येथे अभिजात मराठी OTT चे जागतिक लाँच; अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळीची खास उपस्थिती

भारत पॅव्हेलियन येथे अभिजात मराठी OTT चे जागतिक लाँच झाले. १६ मे रोजी सायंकाळी कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील भारत पॅव्हेलियन येथे आयोजित अभिजात मराठी OTT च्या जागतिक लाँच कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. या लाँच कार्यक्रमानंतर मान्यवर, चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्त्वे, निर्माते, सांस्कृतिक प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय नेटवर्किंग डिनरचे आयोजन करण्यात येणार आहे.

या जागतिक लाँचला अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, अंकिता वालावलकर, जयंती वाघधरे आणि अभिजात मराठी OTT चे संस्थापक केदार जोशी उपस्थित राहिले. अभिजात मराठीचे अधिकृत रेड कार्पेट प्रतिनिधित्व अशोक सराफ यांच्या नेतृत्वाखाली होणार असून मराठी सिनेमा, संस्कृती आणि डिजिटल कथाकथनाचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्यात येणार आहे.

मराठी आणि प्रादेशिक कंटेंटची वाढती जागतिक ओळख, प्रादेशिक कथाकथनाचा प्रभाव आणि भारतीय प्रादेशिक सिनेमा व डिजिटल मनोरंजनासाठी निर्माण होत असलेल्या नव्या संधींवर विशेष पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आलं. अभिजात मराठी हे केवळ मराठी OTT प्लॅटफॉर्म नसून मराठी सिनेमा, भक्ती, लाईफस्टाईल, इन्फोटेन्मेंट आणि AI-आधारित नव्या कथाकथनाचे व्यापक डिजिटल विश्व आहे.

अभिजात मराठीची प्रेरणा २०२४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर निर्माण झाली. हा क्षण जगभरातील मराठी भाषिकांसाठी सांस्कृतिक अभिमानाचा ठरला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही दृष्टी अधिक व्यापक आणि जागतिक स्तरावर पुढे नेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवे बळ दिले आहे.

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी निर्माण केलेले नाविन्यपूर्ण आणि प्रोत्साहनात्मक वातावरण हे या चळवळीचे महत्त्वाचे आधारस्तंभ ठरले आहे. मराठी भाषा, साहित्य, सिनेमा आणि डिजिटल कथाकथन जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या कान्समध्ये अभिजात मराठी OTT च्या जागतिक लाँचची चर्चा आहे.

Web Title : कान्स में अभिजात मराठी ओटीटी का वैश्विक लॉन्च; अशोक सराफ उपस्थित

Web Summary : कान्स फिल्म फेस्टिवल के भारत पवेलियन में अभिजात मराठी ओटीटी का वैश्विक लॉन्च हुआ। अशोक सराफ और कई हस्तियां शामिल हुईं, जो मराठी सिनेमा और डिजिटल कहानी कहने के लिए एक महत्वपूर्ण कदम है। मंच का उद्देश्य विविध सामग्री के माध्यम से मराठी भाषा और संस्कृति को बढ़ावा देना है।

Web Title : Abhijat Marathi OTT Global Launch at Cannes; Ashok Saraf Attends

Web Summary : Abhijat Marathi OTT launched globally at Cannes Film Festival's Bharat Pavilion. Ashok Saraf and other celebrities attended, marking a significant step for Marathi cinema and digital storytelling on a global stage. The platform aims to promote Marathi language and culture through diverse content.