अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारीच्या वेबसीरीजमध्ये अनुराग कश्यपची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 17:00 IST2017-01-12T17:00:09+5:302017-01-12T17:00:09+5:30

कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण सेकंड सीझनची वाट प्रेक्षक काही दिवसांपासून पाहत होते. तसेच या वेब शोचा सेकंद ...

Anurag Kashyap's presence in the website of Ameya Tiger and Achievement Officer | अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारीच्या वेबसीरीजमध्ये अनुराग कश्यपची उपस्थिती

अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारीच्या वेबसीरीजमध्ये अनुराग कश्यपची उपस्थिती

स्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण सेकंड सीझनची वाट प्रेक्षक काही दिवसांपासून पाहत होते. तसेच या वेब शोचा सेकंद सीझन कसा असणार आहे या विचारातदेखील प्रेक्षक होते. कारण काही दिवसांपूर्वी अभिनेता अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांचा कास्टिंग काऊच हा वेब शोने सोशलमीडियावर धमाल केली होती. या वेबशोमध्ये सई ताम्हणकर, प्रिया बापट, राधिका आपटे, श्रेया पिळगावकर अशा अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली आहे. आता पुन्हा या वेब शोचा सेंकद सीझनमध्ये काय असणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून होती. आता प्रेक्षकांची ही इच्छा नुकतीच अमेयने पूर्ण केली असल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. कारण या वेब शोचा पहिला एपिसोड नुकताच सोशलमीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा एपिसोड अमेयने सोशलमीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर त्याने एक पोस्ट ही अपलोड केली आहे. तो आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगतो, अपने बाप का... दादा का...सबका बदला लेगा रे तेरा अनुराग कश्यप सीझन सेकंदचा पहिला एपिसोड आला रे म्हणत अमेय म्हणतो बघा वाटा आणि आवडून घ्या. कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण सेकंड सीझनला प्रेक्षकांनी सोशलमीडियावर भरभरून पसंती दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता अमेय वाघ हा दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. या मालिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.तसेच या मालिकेनंतर तो घंटा या चित्रपटातदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे सध्या त्याचे अमर फोटो स्टुडिओ हे नाटकदेखील चर्चेत आहे. आता तो एका रियालिटी शोच्या माध्यमातून सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.




Web Title: Anurag Kashyap's presence in the website of Ameya Tiger and Achievement Officer