अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:46 IST2025-06-16T12:45:44+5:302025-06-16T12:46:27+5:30

'जारट या मराठी सिनेमाची वाढती लोकप्रियता चर्चेचा विषय आहे. सिनेमाची माऊथ पब्लिसिटी जोरदार होत आहे

amurta subhash and anita date starrer jarann movie collection crossed crore | अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

अमृता सुभाष (Amruta Subhash) आणि अनिता दाते (Anita Date) यांचा 'जारण' (Jarann) हा मराठी सिनेमा चांगलाच गाजत आहे. अनेक प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. गेल्या काही दिवसात 'आता थांबायचं नाय','गुलकंद','एप्रिल मे ९९' हे सिनेमेही गाजले. आता 'जारण'चं कौतुक होत आहे. अंधश्रद्धा आणि वास्तवावर आधारित हा भयपट आणि थ्रिलर सिनेमा आहे. याची कथा, अभिनय, दिग्दर्शन, संगीत सगळंच खिळवून ठेवणारं आहे. ६ जूनला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने किती कमाई केली वाचा.

'जारण' या मराठी  सिनेमाची वाढती लोकप्रियता चर्चेचा विषय आहे. सिनेमाची माऊथ पब्लिसिटी जोरदार होत आहे. अमृता सुभाष आणि अनिता दातेच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. ६ जून रोजी 'जारण' सर्व सिनेमागृहात रिलीज झाला. बॉक्सऑफिसवर सिनेमाने १० दिवसात एकूण ३.५९ कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे. 'जारण' सिनेमाची वाढती क्रेझ पाहता येत्या काही दिवसात कमाईत आणखी बरीच वाढ होण्याचीही शक्यता आहे.

'जारण' सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. तर 'भूलभुलैय्या','वेलकम' यासारखे सुपरहिट सिनेमे देणारे बॉलिवूड दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी 'जारण' सिनेमा प्रस्तुत केला आहे. भालचंद्र कुलकर्णी, अमोल भगत आणि नितीन कुलकर्णी यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. 

सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते म्हणाले, "जारण' हा माझ्यासाठा केवळ एक चित्रपट नाही तर तो माझ्या मनात खोलवर रुजलेल्या अनुभवांचा, निरीक्षणांचा आणि समजुतीचा एक आविष्कार आहे. ही कथा मला अनेक वर्षांपासून सांगायची होती, जी काल्पनिक नसून वास्तव आहे. जेव्हा प्रेक्षक या कथेशी जोडला गेलो, तेव्हा माझं काम सफल झालं असं मला वाटलं. अमृता सुभाष आणि अनिता दाते यांनी या पात्रांना ज्या समर्पणानं साकारलं. प्रेक्षकांचं आणि समीक्षकांचं प्रेम हाच आमच्यासाठी खरा पुरस्कार आहे".

Web Title: amurta subhash and anita date starrer jarann movie collection crossed crore