यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविणार ८० चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 13:44 IST2017-01-15T13:44:01+5:302017-01-15T13:44:01+5:30

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विद्यापीठ, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २६ जानेवारी या ...

80 films to be screened at Yashwantrao Chavan International Film Festival | यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविणार ८० चित्रपट

यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविणार ८० चित्रपट

वंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विद्यापीठ, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २६ जानेवारी या कालावधीत यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव मुंबई येथे भरविण्यात आले आहे. हे या महोत्सवाचे यंदा सातवे वर्ष आहे. या महोत्सवात प्रेक्षकांना विविध भाषेतील आणि देशांमधील निवडक ८० चित्रपट पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हा महोत्सव प्रेक्षकांसाठी खूपच खास असणार असल्याचे महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी सांगतिले. तसेच या महोत्सवाची विभागणी ग्लोबल सेक्शन, कंट्री फोकस, इंडियन सिनेमा आणि मराठी सिनेमा अशा चार गटांत करण्यात आली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लघु चित्रपटांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील काही निवडक लघु चित्रपट मुंबईतील या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.  तसेच आंतरराष्ट्रीय संगीतकार जॉर्ज अ‍ॅरीगड यांचे म्युझिक इन फिल्म्स या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान या महोत्सवात होणार आहे. महोत्सवात दरवर्षी स्मिता पाटील स्मृती व्याख्यानाचे आयोजनही केले जाते. यंदा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे व्याख्यान व त्यांच्याशी गप्पा असा कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवात लठ्ठे जोशी, हुमा, एक ते चार बंद हे तीन मराठी चित्रपट दाखविण्यात येणार असून चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यांच्याशी संवादाचा कार्यक्रमही होणार आहे. तसेच या महोत्सवात  महोत्सवात १३ लाईव्ह शॉर्ट फिल्म व १६ अ‍ॅनिमेशन फिल्मही दाखवल्या जाणार आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल हे या महोत्सवाचे संचालक आहेत. 

Web Title: 80 films to be screened at Yashwantrao Chavan International Film Festival