पहिल्याच चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या मुलीला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, म्हणाली- "आमच्या लेकीला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:19 IST2026-02-19T15:16:00+5:302026-02-19T15:19:57+5:30
मराठी सिनेमातून साजिरीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. 'एप्रिल मे ९९' या सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती. विशेष म्हणजे या सिनेमासाठी आता साजिरीला झी चित्रगौरव पुरस्कार मिळाला आहे.

पहिल्याच चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या मुलीला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, म्हणाली- "आमच्या लेकीला..."
ऋजुता देशमुख ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. ऋजुताच्या पावलावर पाऊल ठेवत तिची लेक साजिरी हिनेदेखील गेल्या वर्षी अभिनयात पदार्पण केलं. मराठी सिनेमातून साजिरीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. 'एप्रिल मे ९९' या सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती. विशेष म्हणजे या सिनेमासाठी आता साजिरीला झी चित्रगौरव पुरस्कार मिळाला आहे.
साजिरीला झी चित्र गौरवच्या 'सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण अभिनेत्री' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. साजिरीला पुरस्कार मिळाल्यानंतर ऋजुता देशमुखने पोस्ट शेअर करत लेकीचं कौतुक केलं आहे. "अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण !! पहिला चित्रपट, पहिलं बक्षीस, भरपूर कौतुक आणि प्रेक्षकांचं प्रेम....आमच्या लेकीला 'साजिरी जोशी' हिला झी चित्र गौरव चा 'सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण अभिनेत्री' पुरस्कार मिळाला आहे! परीक्षकांचे, झी कुटुंबाचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार. अत्यंत महत्त्वाची व्यक्ती रोहन म्हापुसकर आणि एप्रिल मे ९९ ची संपूर्ण टीम यांच्याशिवाय हे अशक्य होतं. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. ऋजुताच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी साजिरीचं अभिनंदन केलं आहे.
'एप्रिल मे ९९' हा सिनेमा २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. कोकणातील उन्हाळ्याच्या सुट्टीतील मुलांची गोष्ट सिनेमातून दाखवण्यात आली होती. रोहन मापुसकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात साजिरी जोशी, आर्यन मेंघजी, श्रेयस थोरात आणि मंथन काणेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.