Kim Kardashian Viral Video: Hot दिसण्याच्या नादात किम कार्दाशियनची झाली फजिती, उड्या मारत चढाव्या लागल्या पायऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 11:29 AM2022-09-28T11:29:36+5:302022-09-28T11:31:04+5:30

किम कार्दाशियन नेहमीच आपल्या Hot & Bold लूकमुळे चर्चेत असते.

Kim Kardashian in hot sexy silver gown struggling to climb steps video gone viral on internet trolling | Kim Kardashian Viral Video: Hot दिसण्याच्या नादात किम कार्दाशियनची झाली फजिती, उड्या मारत चढाव्या लागल्या पायऱ्या

Kim Kardashian Viral Video: Hot दिसण्याच्या नादात किम कार्दाशियनची झाली फजिती, उड्या मारत चढाव्या लागल्या पायऱ्या

googlenewsNext

Kim Kardashian Viral Video: बर्‍याचदा अभिनेत्री हॉट (Hot) दिसण्यासाठी खूप विचित्र कपडे घालतात. हॉलिवूडच्या अभिनेत्री या बाबतीत कायमच अग्रेसर दिसतात. नुकताच असा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक अभिनेत्री तिच्या आउटफिटमध्ये फार अवघडल्यासारखी (uncomfortable) दिसत आहे. या विचित्र ड्रेसमध्ये अभिनेत्रीची अवस्था अशी झाली की तिला मुक्तपणे हालचाल करणेही कठीण झाले आहे. हा व्हिडीओ समोर येताच, एका ड्रेससाठी एवढ्या अडचणी का सहन कराव्या, आरामदायी ड्रेसमध्ये कार्यक्रमाला का उपस्थित राहता येत नाही, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे.

हॉलिवूडची अभिनेत्री किम कार्दाशियनचा नुकताच एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओवरून अभिनेत्री चांगलीच ट्रोल झाली आहे. वास्तविक रियॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दाशियनने अलीकडेच 'मिलान फॅशन वीक'मध्ये हजेरी लावली. यावेळी तिने सिल्व्हर रंगाचा स्पार्कलिंग बॉडीकॉन गाऊन परिधान केला होता. या आउटफिटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती, परंतु हा बॉडीकॉन ड्रेस घातल्याने तिची अवस्था खूपच अवघडल्यासारखी झाली होती.

किम कार्दाशियनचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तिचा ड्रेससोबतचा संघर्ष स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की किमला पायऱ्यांवरून व्यवस्थित चालता येत नाहीये. व्हिडीओमध्ये किमला उंच टाचांचे शूज घालूनही पायऱ्यांवरून उडी मारत-मारत जिना चढावा लागतोय. पाहा व्हिडीओ-

किमने स्वतः तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे. पण आता या व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. पण किमला ट्रोलिंगची फारशी पर्वा नसते, कारण ती प्रत्येक नव्या इव्हेंट्समध्ये अधिक बोल्ड आउटफिट्समध्ये दिसते.

Web Title: Kim Kardashian in hot sexy silver gown struggling to climb steps video gone viral on internet trolling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.