बॉलिवूडच्या या बड्या दिग्दर्शकाने घेतला जगाचा निरोप; धर्मेंद्र झाले भावुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 21:03 IST2018-05-06T15:31:06+5:302018-05-06T21:03:54+5:30

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते अर्जुन हिंगोरानी यांनी आज या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली ...

The world's best-known director of Bollywood; Dharmendra got emotional! | बॉलिवूडच्या या बड्या दिग्दर्शकाने घेतला जगाचा निरोप; धर्मेंद्र झाले भावुक!

बॉलिवूडच्या या बड्या दिग्दर्शकाने घेतला जगाचा निरोप; धर्मेंद्र झाले भावुक!

लिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते अर्जुन हिंगोरानी यांनी आज या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीचा सर्वात जास्त धक्का अभिनेते धर्मेंद्र यांना बसला आहे. याविषयी त्यांनी ट्विटरवर अतिशय भावनिक ट्विट करून दु:ख व्यक्त केले. धर्मेंद्र यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक अर्जुन हिंगोरानी यांनी दिला होता. त्यामुळेच धर्मेंद्र हे अतिशय भावुक झाल्याचे दिसून आले. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपले दु:ख व्यक्त केले. 





धर्मेंद्र यांनी आपल्या इमोशनल मेसेजमध्ये लिहिले की, ‘अर्जुन हिंगोरानी, ते व्यक्ती ज्यांनी मुंबईमध्ये एकट्या असलेल्या व्यक्तीच्या पाठीवर आपला हात ठेवला, ते आम्हाला कायमचे सोडून गेले आहेत. मी खूपच दु:खी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो! दरम्यान, अर्जुन हिंगोरानी यांच्या निधनाचे कारण समजू शकले नाही. त्यांचा मृत्यू नैसर्गिक झाला की, ते कुठल्यातरी आजाराने ग्रस्त होते? हे अजुनही स्पष्ट झाले नाही. 
 }}}} ">Arjun Hingorani, the man who put his hand around the shoulder of this loner in Mumbai, has left us forever ... I am extremely sad! May his soul rest in peace!! pic.twitter.com/KYnOTHZHBK— Dharmendra Deol (@aapkadharam) May 6, 2018
दरम्यान, अर्जुन हिंगोरानी यांनी ६० ते ९० च्या दशकात अतिशय उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली. ज्याकरिता बॉलिवूड त्यांना कायमचे स्मरणात ठेवील. अर्जुन यांनी धर्मेंद्रला ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून पहिली संधी दिली होती. त्यांना त्यांच्या ‘कब, क्यों और कहॉँ’ या चित्रपटासाठी कायमचे स्मरणात ठेवले जाते. त्याचबरोबर १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘कौन करे कुर्बानी, सहेली, कहानी किस्मत की, खेल खिलाडी’ या चित्रपटांनीही प्रेक्षकांवर छाप सोडली होती. 

Web Title: The world's best-known director of Bollywood; Dharmendra got emotional!