​- तर राखी सावंतला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष बनवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 19:42 IST2016-09-22T14:11:00+5:302016-09-22T19:42:17+5:30

‘एक कहानी जुली की’ या चित्रपटाच्या रिलीजवेळी बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्यावर ...

- Then make Rakhi Sawant the president of the censor board | ​- तर राखी सावंतला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष बनवा

​- तर राखी सावंतला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष बनवा

क कहानी जुली की’ या चित्रपटाच्या रिलीजवेळी बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्यावर कडाडून टीका केली होती. ‘एक कहानी जूली की’ या चित्रपटास ‘ए’ सर्टिफिकेट देण्याच्या निर्णयाविरोधात राखीने मोठा हंगामा केला होता. ‘मी कोणी पॉर्न स्टार नाही. मी या सिनेमाची अभिनेत्री आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड मी त्या सिनेमात असेन तर ते बदनामीकारकच आहे असा विचार आधीपासूनच कसा करु शकते’, असा दावा करीत तिने सेन्सॉर बोर्डावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता.  राखीच्या या आरोपाला निहलानी यांनी इतक्या दिवसांनंतर प्रतिउत्तर दिले आहे. एका कार्यक्रमात राखीच्या आरोपाबद्दल निहलानी यांना छेडण्यात आले,यावर त्यांच्या मनातील सर्व खदखद बाहेर पडली. राखीला माझे काम आवडलेले नसेल तर तिने माझ्या खुर्चीवर बसावे. मी स्वत: सरकारला माझ्या जागी राखीला बसवण्याची विनंती करेल. कदाचित सेन्सॉर बोर्डात आल्यानंतर सनी लिओनीसोबत तिची स्पर्धा अधिक सोपी होईल,अशा शब्दांत त्यांनी राखीला लक्ष्य केले. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर आधी केवळ निर्माते, दिग्दर्शक बोलायचे. आता तर कलाकारही तोंडात येईल ते बोलू लागले आहेत. काही दिवसांनी स्पॉट बॉयही बोर्डावर टीका करतील. राखीला सेन्सॉर बोर्डाच्या नियमांचा अ की ढ माहित नाही,असेही ते म्हणाले.

Web Title: - Then make Rakhi Sawant the president of the censor board