‘काबिल’ साठी सुरक्षा तैनात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 14:55 IST2016-05-15T09:25:32+5:302016-05-15T14:55:32+5:30

 ‘जज्बा’ नंतर दिग्दर्शक संजय गुप्ता हे आता हृतिक रोशन आणि यामी गौतमसह ‘काबिल’ चित्रपट बनवणार आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ...

Security for 'capable' deployed! | ‘काबिल’ साठी सुरक्षा तैनात !

‘काबिल’ साठी सुरक्षा तैनात !

 
जज्बा’ नंतर दिग्दर्शक संजय गुप्ता हे आता हृतिक रोशन आणि यामी गौतमसह ‘काबिल’ चित्रपट बनवणार आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीजर देखील रिलीज करण्यात आला होता. मुंबईच्या व्हर्साेवा भागात चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. मात्र चित्रपटाची टीम काबिलच्या शुटींगच्या संदर्भात प्रचंड सुरक्षितता पाळत असल्याचे दिसत आहे.

संजय आणि हृतिक या दोघांनाही चित्रपटाची कुठलीही माहिती बाहेर लीक होऊ नये असे वाटत आहे. चित्रपटाची टीम देखील अत्यंत कमी प्रमाणात आणि कमीत कमी लोकांना शूटिंगच्या जवळ एन्ट्री देण्यात आलेली आहे. टीजर रिलीज करण्यात आला तेव्हापासूनच खरंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली होती. २६ जानेवारी २०१७ ला चित्रपट रिलीज करण्याची शक्यता आहे.

Web Title: Security for 'capable' deployed!