"तो माझ्या भावासारखा होता..."; सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, अभिनेत्याने लिहिली भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 10:55 IST2026-05-04T10:53:50+5:302026-05-04T10:55:21+5:30

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सलमानचा अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे

Salman Khan emotional post after death of his best friend sushil kumar | "तो माझ्या भावासारखा होता..."; सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, अभिनेत्याने लिहिली भावुक पोस्ट

"तो माझ्या भावासारखा होता..."; सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, अभिनेत्याने लिहिली भावुक पोस्ट

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सलमानचा अत्यंत जवळचा मित्र सुशील कुमार यांचे नुकतेच निधन झाले आहे. सुशील आणि सलमान यांची ४२ वर्षांची मैत्री होती. सलमानने या प्रसंगी सोशल मीडियावर एक अतिशय भावुक पोस्ट लिहून मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

४२ वर्षांची मैत्री संपली

सलमानने आपल्या मित्राच्या निधनावर शोक व्यक्त करताना लिहिले की, "हा माणूस गेल्या ४२ वर्षांपासून माझ्या भावासारखा होता. तो खूप चांगला, दयाळू आणि मदतीला धावून जाणारा व्यक्ती होता. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तो नेहमी हसत आणि नाचत असायचा. कोणतीही आर्थिक, भावनिक किंवा शारीरिक समस्या असेल तरी तो नेहमी म्हणायचा की, 'काही फरक पडत नाही, सर्व काही ठीक होईल'."

सलमानने पोस्टमध्ये पुढे लिहिले, "तुझ्यासाठी डोळ्यांत पाणी नाही मित्रा, फक्त तुझ्या आठवणी आणि तुझे हसणे मनात राहील. माझा भाऊ हसत-हसत या जगातून गेला, शाब्बास! तू तुझे आयुष्य एका चॅम्पियनसारखे जगला आहेस. आता तू सिगारेट आणि व्हिस्कीचा आनंद घे, मला तुझी खूप आठवण येईल."

मित्राच्या निधनानंतर सलमानने दुसरी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने जीवनातील सत्य सर्वांसमोर आणले. सलमानने लिहिले की, ''ज्याला जायचे आहे त्याला कधीही थांबवू नका. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचेच आहे आणि देव चांगल्या माणसांना लवकर बोलावून घेतो. लोक सोशल मीडियावर RIP लिहित आहेत. मी तुला 'पार्थिव' म्हणणार नाही, कारण तुझे व्यक्तिमत्त्व त्या पलीकडचे होते. मी तुला फक्त सुशील कुमार म्हणूनच हाक मारेन.'' सलमान खानच्या या पोस्टवरून त्याच्या मनातील वेदना आणि आपल्या मित्राप्रती असलेले अफाट प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे. 

Web Title : सलमान खान के करीबी दोस्त का निधन; अभिनेता ने भावुक श्रद्धांजलि लिखी।

Web Summary : सलमान खान ने अपने करीबी दोस्त सुशील कुमार के निधन पर शोक व्यक्त किया, जिनकी दोस्ती 42 साल पुरानी थी। उन्होंने सोशल मीडिया पर एक भावुक श्रद्धांजलि साझा की, जिसमें कुमार की सकारात्मक भावना और अटूट समर्थन को याद किया। सलमान ने उनके बंधन को याद करते हुए कुमार के जीवन और प्रभाव का जश्न मनाया।

Web Title : Salman Khan's close friend passes away; actor pens emotional tribute.

Web Summary : Salman Khan mourns the loss of his close friend, Sushil Kumar, after 42 years of friendship. He shared a heartfelt tribute on social media, remembering Kumar's positive spirit and unwavering support. Salman reminisced about their bond, celebrating Kumar's life and impact.