Rohit Shetty : सिग्नल App अन् पुण्याचं कनेक्शन; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 15:26 IST2026-02-03T15:24:19+5:302026-02-03T15:26:21+5:30

Rohit Shetty : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचचा तपास जसजसा पुढे सरकत आहे.

Rohit Shetty house firing case mumbai police investigation | Rohit Shetty : सिग्नल App अन् पुण्याचं कनेक्शन; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

Rohit Shetty : सिग्नल App अन् पुण्याचं कनेक्शन; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या कटाचे एकामागून एक पदर उलगडत आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या आरोपींनी गोळीबारापूर्वी जुहू परिसर आणि रोहित शेट्टीच्या घराची कित्येक दिवस रेकी केली होती अशी माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या मते हा हल्ला अचानक झालेला नसून त्यामागे मोठी तयारी आणि नियोजन होतं.

तपासात असंही निष्पन्न झालं आहे की, गोळीबारासाठी ज्या स्कूटरचा वापर करण्यात आला, त्याच स्कूटरवरून आधी रेकी करण्यात आली होती. हल्ल्यानंतर सहजपणे पसार होता यावं हा त्यामागचा स्पष्ट उद्देश होता. घटनेच्या दिवशी शूटरने रोहित शेट्टीच्या घराबाहेर पाच राऊंड फायर केले आणि त्यानंतर स्कूटरवरून पळ काढला. त्यानंतर तो विलेपार्ले रेल्वे स्टेशनला पोहोचला, तिथे स्कूटर सोडून दिली आणि ट्रेनने मुंबईबाहेर पसार झाला.

घरावर झालेल्या गोळीबारानंतर रोहित शेट्टीने सर्व प्लॅन्स केले रद्द; जवळच्या मित्रांना केली 'ही' विनंती

पुण्यातून खरेदी केली होती स्कूटर

क्राईम ब्रांचच्या तपासात समोर आलं आहे की, गोळीबारात वापरलेली स्कूटर पुण्यातून ३० हजार रुपयांना विकत घेतली होती. ही स्कूटर खरेदी करण्यासाठी मास्टरमाइंड शुभम लोणकर याने पैसे दिले होते. ही स्कूटर मुळात आनंद मारोटे यांच्या नावावर नोंदणीकृत होती, त्यांनी ती २००९ मध्ये खरेदी केली होती. घटनेच्या सुमारे १२ दिवस आधी मारोटे यांनी ही स्कूटर आरोपी आदित्य गायकवाडला विकली होती.

लोणावळ्याहून मुंबईत पोहोचली स्कूटर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोमाजी याच्या सूचनेवरून सिद्धार्थ येनपुरे आणि स्वप्नील सकट हे स्कूटर पुण्याहून रस्तेमार्गे लोणावळ्याला घेऊन आले होते. मात्र शूटर लोणावळ्याला पोहोचू शकला नाही म्हणून सुमारे १० दिवसांपूर्वी ही स्कूटर मुंबईत आणून थेट अज्ञात शूटरच्या हवाली करण्यात आली. या कामासाठी आरोपींना अतिरिक्त पैसेही देण्यात आले होते. समर्थ पोमाजीने या कटात सक्रिय भूमिका बजावल्याचे तपासकर्त्यांचे म्हणणं आहे. तो सतत शुभम लोणकरच्या संपर्कात होता आणि 'सिग्नल' एपद्वारे त्यांच्यात संवाद होत असे.

 मध्यरात्री थरार! गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबाबत मिळाली मोठी माहिती

पोलिसांच्या मते, आपण एका गुन्हेगारी कटाचा भाग आहोत याची समर्थला कल्पना होती. मात्र टार्गेट नक्की कोणाचं घर आहे, हे त्याला माहीत नव्हतं. तरीही त्याने हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी मोठं योगदान दिलं. मुंबई क्राईम ब्रांच सध्या या प्रकरणातील प्रत्येक दुवा जोडण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणाशी संबंधित आणखी मोठे खुलासे होऊ शकतात असं पोलिसांचं म्हणणं आहे.

Web Title : रोहित शेट्टी शूटिंग: सिग्नल ऐप से पुणे कनेक्शन का खुलासा।

Web Summary : रोहित शेट्टी के घर पर हुई गोलीबारी में पुणे से खरीदी गई स्कूटर का इस्तेमाल किया गया। मास्टरमाइंड ने खरीद के लिए पैसे दिए। सिग्नल ऐप से संचार हुआ, जिससे आपराधिक साजिश का पता चला। और खुलासे अपेक्षित हैं।

Web Title : Rohit Shetty Shooting: Pune connection revealed via Signal app.

Web Summary : Rohit Shetty's house shooting involved a Pune-bought scooter used for reconnaissance. Mastermind funded the purchase. The Signal app facilitated communication, revealing a planned criminal conspiracy. More revelations expected.