'धुरंधर' रणवीर सिंह चिमुकल्या 'दुआ'ला घेऊन पोहोचला लाईव्ह शोमध्ये; दीपिकाच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीनंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:09 IST2026-04-27T11:07:42+5:302026-04-27T11:09:17+5:30

नुकतंच रणवीर हा आपली लाडकी लेक दुआ हिला तिच्या आयुष्यातील पहिल्या-वहिल्या लाईव्ह शोसाठी घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं.

Ranveer Singh Daughter Dua First Live Show Nmacc Deepika Padukone Pregnancy | 'धुरंधर' रणवीर सिंह चिमुकल्या 'दुआ'ला घेऊन पोहोचला लाईव्ह शोमध्ये; दीपिकाच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीनंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण

'धुरंधर' रणवीर सिंह चिमुकल्या 'दुआ'ला घेऊन पोहोचला लाईव्ह शोमध्ये; दीपिकाच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीनंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण

बॉलिवूडचे पॉवर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह कायमच चर्चेत असतात. नुकतंच रणवीर हा आपली लाडकी लेक दुआ हिला तिच्या आयुष्यातील पहिल्या-वहिल्या लाईव्ह शोसाठी घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं. ज्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

रणवीर सिंग मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र (NMACC) येथे आयोजित 'कोकोमेलॉन सिंग-अ-लाँग लाईव्ह' या मुलांच्या लाडक्या कार्यक्रमात दुआला घेऊन पोहोचला होता. आपल्या मुलीला जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी रणवीर स्वतः तिथे उपस्थित होता.

कार्यक्रमानंतर रणवीरने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, हा क्षण त्याच्यासाठी अत्यंत भावूक आणि खास होता. तो म्हणाला, "आमच्या 'दुआ बेबी'चा हा पहिलाच लाईव्ह शो आहे, त्यामुळे हे आमच्यासाठी खूप खास आहे. आम्हाला असे जागतिक दर्जाचे अनुभव आणि आयुष्यभर टिकणाऱ्या आठवणी तयार करण्याची संधी दिल्याबद्दल मी NMACC टीमचा मनापासून आभारी आहे".

दुसऱ्यांदा आई-बाबा होणार
रणवीर आणि दीपिकाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, दीपिकाने नुकतीच तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक गोड पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिची मुलगी दुआ प्रेग्नन्सी टेस्ट हातात धरलेली दिसत होती. सप्टेंबर २०२४ मध्ये दुआचा जन्म झाल्यानंतर आता हे जोडपे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत.

 'धुरंधर २'ची बॉक्स ऑफिसवर हवा
रणवीर सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'धुरंधर द रिव्हेंज' हा स्पाय थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवतोय आहे. या चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटानं जागतिक स्तरावर आतापर्यंत १७०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 
 

Web Title : रणवीर सिंह दुआ को शो में ले गए; दीपिका की दूसरी प्रेग्नेंसी की खुशी।

Web Summary : रणवीर, दुआ को NMACC में उसके पहले लाइव शो में ले गए। उन्होंने इसे खास पल बताया। दीपिका ने अपनी दूसरी प्रेग्नेंसी की घोषणा की। रणवीर की फिल्म 'धुरंधर 2' बॉक्स ऑफिस पर हिट रही।

Web Title : Ranveer Singh with Dua at show; Deepika's second pregnancy joy.

Web Summary : Ranveer took Dua to her first live show at NMACC. He called it a special moment. Deepika announced her second pregnancy. Ranveer's film 'Dhurandhar 2' is a box office hit.