रणदीप हुड्डाने दाखवली मुलीची पहिली झलक; क्यूटनेस पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:29 IST2026-04-20T12:29:34+5:302026-04-20T13:29:22+5:30
रणदीप आणि लिन यांनी २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मणिपूरमध्ये विवाह केला होता.

रणदीप हुड्डाने दाखवली मुलीची पहिली झलक; क्यूटनेस पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन सध्या पालकत्वाचा आनंद लुटत आहेत. १० मार्च २०२६ रोजी त्यांच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाले होते. आता लिनने सोशल मीडियावर आपल्या एक महिन्याची लेक 'न्योमिका' (Nyomika) हिची पहिली झलक शेअर केली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लिनने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये आई आणि लेकीचे खास नाते पाहायला मिळत आहे. पहिल्या फोटोमध्ये लिन न्योमिकाला आपल्या कुशीत घेऊन सेल्फी घेताना दिसत आहे. जरी या फोटोंमध्ये चिमुकल्या न्योमिकाचा चेहरा पूर्णपणे स्पष्ट दिसत नसला, तरी तिचे गोंडस रूप पाहून चाहत्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. "सध्या असं आयुष्य सुरू आहे" असे कॅप्शन देत लिनने आपला आनंद व्यक्त केला आहे.
न्योमिका एक महिन्याची झाल्यावर या जोडप्याने तिचे नाव जाहीर केले होते. आपल्या मुलीचे नाव 'न्योमिका' ठेवल्याचे सांगताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "आमच्या जगाचे नवीन केंद्र - न्योमिका. जिचा अर्थ आहे दैवी कृपा, स्वातंत्र्य आणि आकाशासारखी अमर्याद".
रणदीप आणि लिन यांनी २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मणिपूरमध्ये पारंपारिक 'मैतेई' पद्धतीने विवाह केला होता. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी, म्हणजेच नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांनी 'गुड न्यूज' शेअर केली होती.