"आलियाने मला मारलंच असतं..." Animal ट्रेलर लॉन्चवेळी रणबीर कपूरने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 02:30 PM2023-11-24T14:30:12+5:302023-11-24T14:30:55+5:30

Animal शूटवेळीच राहाचा जन्म झाला. रणबीर म्हणाला,...

Ranbir Kapoor revealed Alia bhat would have beaten him up if he had gone home with intense look from film | "आलियाने मला मारलंच असतं..." Animal ट्रेलर लॉन्चवेळी रणबीर कपूरने केला खुलासा

"आलियाने मला मारलंच असतं..." Animal ट्रेलर लॉन्चवेळी रणबीर कपूरने केला खुलासा

अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) आगामी बहुचर्चित Animal सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून रणबीरचे चाहते अक्षरश: सरप्राईज झालेत. वडीलांचं प्रेम मिळवण्यासाठी तो पेटून उठला आहे. तर बॉबी देओलचा वाईल्ड लूक पाहून अंगावर काटा येणार यात शंका नाही. दिल्लीत सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. यावेळी रणबीर म्हणाला जर तो 'अॅनिमल'ची पडद्यावरची भूमिका घेऊनच घरी गेला असता तर आलियाने त्याला मारलेच असते. 

अॅनिमलमध्ये रणबीर कपूरचा लूक, त्याची भूमिका खूपच इंटेन्स आहे. त्यामुळेच जर शूटिंगनंतर तो त्याच मूडमध्ये असला असता तर आलिया भट्टने त्याला नक्की मारलं असतं. अभिनेत्याने ट्रेलर लाँचप्रसंगी हा खुलासा केला. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या सिनेमात रणबीरने खूपच हिंसात्मक आणि गंभीर भूमिका साकारली आहे. 

रणबीर म्हणाला, "स्विच ऑन आणि ऑफ हे फार महत्वाचं असतं. कारण अॅनिमलचं शूट सुरु असतानाच राहाचा जन्म झाला. मी सेटवर अशा हिंसक अवतारात असायचो आणि घरी आल्यावर लेकीला बघणं म्हणजे स्वप्नासारखंच असायचं. जेव्हा तुम्हाला प्रेरणा देणारं कोणी असतं तेव्हा काम सोप्पं होतं. आम्ही जवळपास १०० दिवसात सिनेमाचं शूट पूर्ण केलं."

तो पुढे म्हणाला, "मी खूप वेगळा आहे. मी माझी भूमिका कधीच घरी घेऊन जात नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांसोबत ते चुकीचं असेल. मी घरी जाऊन अॅनिमल सारखं वागलो असतो तर पत्नीने मला मारलंच असतं."

रणबीरचा 'अॅनिमल' १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरची फ्रेश जोडी आहे. तर अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: Ranbir Kapoor revealed Alia bhat would have beaten him up if he had gone home with intense look from film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.