प्रकाश राज यांनी 'चंद्रयान 3' ची उडवली खिल्ली, नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, "देशाची निंदा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 03:38 PM2023-08-21T15:38:42+5:302023-08-21T15:40:52+5:30

राजकीय कमेंट करण्याच्या नादात प्रकाश राज यांनी 'चंद्रयान 3' चीच खिल्ली उडवली आहे.

Prakash Raj controversial tweet on chandrayan 3 puts him in trouble netizen trolled him | प्रकाश राज यांनी 'चंद्रयान 3' ची उडवली खिल्ली, नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, "देशाची निंदा..."

प्रकाश राज यांनी 'चंद्रयान 3' ची उडवली खिल्ली, नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, "देशाची निंदा..."

googlenewsNext

साऊथ तसंच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका गाजवणारे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) सध्या राजकीय मुद्दयांवर भाष्य केल्यानेही चर्चेत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर ते ट्रोलही होतात. आता नुकतंच त्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे ते अडचणीत आले आहेत. 'चंद्रयान 3' (Chandrayan 3) ची खिल्ली उडवणारं हे त्यांचं ट्वीट असल्याने नेटकऱ्यांचा संताप झाला आहे. 

'चंद्रयान 3'ने अवकाशात झेप घेतल्यावर सर्वच भारतीयांना गर्व वाटला. २३ ऑगस्ट रोजी 'चंद्रयान 3' चंद्रावर प्रवेश करणार आहे. आतापर्यंत विक्रम लँडरने काही फोटोही पाठवले आहेत. प्रकाश राज यांनी मात्र भारतीय वैज्ञानिकांच्या या यशाची जणू खिल्लीच उडवली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले, 'ब्रेकिंग न्यूज! हे बघा विक्रम लँडरने पाठवलेली चंद्राची पहिली झलक. वॉव!' यासोबतच त्यांनी हातात चहाची किटली घेतलेल्या एका माणसाचा कार्टुन फोटो जोडला आहे.

प्रकाश राज यांचं हेच ट्वीट नेटकऱ्यांच्या अजिबात पसंतीस पडलेलं नाही. चहावाल्याचं ते कार्टून म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधल्याचं दिसतंय. यासोबतच त्यांनी 'चंद्रयान 3' चीही खिल्ली उडवली आहे. 'कोणाची इतकीही निंदा करु नका की ती देशाची निंदा केल्यासारखं दिसेल' अशी कमेंट करत एका युझरने प्रकाश राज यांना सुनावलं आहे.  'तुमचं नाव प्रकाश आहे पण अर्थ अंधारात आहे', 'तुम्ही इतकी खालची पातळी गाठली आहे की देशवासी म्हणण्यचीही लाज वाटत आहे. आम्हाला इस्रोचा अभिमान आहे..जय हिंद' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

'चंद्रयान 3' शेवटच्या टप्प्यात पोहोचलं आहे. २३ ऑगस्टला ते चंद्रावर प्रवेश करेल अशी आशा सर्वांनाच आहे. सगळ्या भारतीयांचं त्याकडे लक्ष लागलं आहे. 

Web Title: Prakash Raj controversial tweet on chandrayan 3 puts him in trouble netizen trolled him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.