घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान स्पॉट झाली मौनी रॉय, हातात दिसली डायमंड रिंग, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:54 IST2026-05-14T13:53:46+5:302026-05-14T13:54:07+5:30
मौनी पती सूरज नांबियारच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. लग्नानंतर चार वर्षांनी ते दोघे वेगळे झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यानच मौनीला स्पॉट करण्यात आलं आहे.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान स्पॉट झाली मौनी रॉय, हातात दिसली डायमंड रिंग, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री मौनी रॉयच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. मौनी पती सूरज नांबियारच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. लग्नानंतर चार वर्षांनी ते दोघे वेगळे झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्यानंतर मौनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून प्रायव्हसी देण्याची विनंती चाहत्यांना केली होती. आता घटस्फोटाच्या चर्चांदरम्यानच मौनीला स्पॉट करण्यात आलं आहे.
मुंबईतील वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये मौनीला स्पॉट करण्यात आलं. मौनी तिच्या मैत्रिणीसोबत डिनरसाठी गेली होती. रेस्टॉरंटमधून बाहेर येताच मौनी पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. मौनीने यावेळी काळ्या रंगाचा ड्रेस घातल्याचं दिसलं. तिच्या हातात डायमंडची रिंगही दिसली. पण, मौनीने पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या नाहीत. तिचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या पापाराझी अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
मौनी आणि सूरजच्या घटस्फोटाच्या चर्चा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा त्या दोघांनी इन्स्टाग्रामवरुन एकमेकांना अनफॉलो केलं. लग्नाचे फोटोही त्यांनी डिलीट केले. घटस्फोटाच्या चर्चांनंतर सूरज नांबियारने त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंटच डिलीट केलं आहे. अद्याप दोघांपैकी कोणीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. सूरज नांबियार हा एक बिजनेसमॅन आहे.