मिलिंदला मिळाली आईची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 14:52 IST2016-08-04T09:22:35+5:302016-08-04T14:52:35+5:30

मॉडेल मिलिंद सोमणने नुकतच 'द ग्रेट इंडिया रन'च्या माध्यमातून अहमदाबाद ते मुंबई असे एकूण 527 किमी अंतर धावत पूर्ण केलं. विशेष म्हणजे मिलिंद सोमणने अनवाणी हे अंतर पार केले. यात त्याच्या आईने त्याला एक दिवस तरी साथ दिली.

Milind got it along with mother | मिलिंदला मिळाली आईची साथ

मिलिंदला मिळाली आईची साथ

डेल मिलिंद सोमणने नुकतच 'द ग्रेट इंडिया रन'च्या माध्यमातून अहमदाबाद ते मुंबई असे एकूण 527 किमी अंतर धावत पूर्ण केलं. विशेष म्हणजे मिलिंद सोमणने अनवाणी हे अंतर पार केले. यात त्याच्या आईने त्याला एक दिवस तरी साथ दिली. त्याची आई उषा सोमण यांचं वय 78 असूनदेखील या सगळ्यात त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मिलिंद सोमणने आपल्या आईसोबत धावतानाचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर शेअर केला आहे. महाराष्ट्रातील मनोर येथे पोहोचल्यावर उषा यांनी मिलिंदला साथ दिली. त्यांना पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्क बसला होता. 78 हा फक्त आपल्यासाठी एक आकडा असल्याचे उषा सोमण यांनी यातून सिद्ध केलं आहे. उषा सोमण यांनी याआधीही 100 किमी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. पहिल्याच दिवशी म्हणजे 26 जुलै रोजी मिलिंदने अहमदाबाद ते आणंद हे 67 किलोमीटरचे अंतर अनवाणी पार केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो 62 किलोमीटर धावला. मिलिंद सोमण मुंबईत गेट वे ऑफ इंडियाला पोहोचल्यानंतर त्याचे हे अंतर पूर्ण होणार आहे.

Web Title: Milind got it along with mother