माहिरा खान प्रेग्नंट नाही? स्वत:च केला खुलासा, अभिनयातून ब्रेक घेण्यावरही दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 14:03 IST2024-02-13T14:02:30+5:302024-02-13T14:03:32+5:30

काय म्हणाली शाहरुखची पाकिस्तानी अभिनेत्री?

Mahira Khan denied pregnancy talk says she is doing netflix show with fawad khan | माहिरा खान प्रेग्नंट नाही? स्वत:च केला खुलासा, अभिनयातून ब्रेक घेण्यावरही दिलं स्पष्टीकरण

माहिरा खान प्रेग्नंट नाही? स्वत:च केला खुलासा, अभिनयातून ब्रेक घेण्यावरही दिलं स्पष्टीकरण

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली. माहिराला पहिल्या पतीपासून १५ वर्षांचा अजलान हा मुलगा आहे.  दुसऱ्या लग्नानंतर ती तीन महिन्यातच प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसंच तिने नेटफ्लिक्स ओरिजनल सीरिजही सोडली असल्याचं बोललं गेलं.  मात्र आता यावर माहिराने स्वत:च स्पष्टीकरण दिलं आहे.  

माहिराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सर्व चर्चांचं खंडन केलं आहे. ती म्हणाली, "मी प्रेग्नंट आहे यात यात काहीही तथ्य नाही. मी नेटफ्लिक्स सीरिजही सोडलेली नाही." लग्नानंतरही माहिरा करिअरवरच लक्ष केंद्रित करणार आहे. तिच्या करिअरसाठी हा नेटफ्लिक्स प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे. तसंच बऱ्याच काळापासून ती काम करण्यासाठी उत्सुक होती. 

माहिराच्या प्रेग्नंसीबाबत व्हायरल पोस्ट अशी होती की, "तिने अभिनयातून ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला आहे. कारण ती सप्टेंबरमध्ये बाळाला जन्म देणार आहे. तसंच तिने फवाद खानसोबतचा नेटफ्लिक्स प्रोजेक्टही सोडला आहे." मात्र या सर्व चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं तिनेच आता स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वी माहिरा खानने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. तिने लिहिले, "बरोबर १० वर्षांपूर्वी माझं आयुष्य बदललं. मी २५ वा वाढदिवस साजरा करणार होते आणि एका बाळाची आई झाले होते. हे १० वर्ष म्हणजे १ हजार वर्षासारखे वाटत आहेत. आयुष्यभराचा अनुभव मिळाला असं वाटत आहे. मी आई झाले, अभिनेत्री झाले. मला यश आणि प्रसिद्धी मिळाली. मी प्रेमात पडले. अनेकदा मी निराश व्हायचे पण जिद्द कधीच सोडली नाही. मला माझ्या स्वप्नांची जाणीव झाली आणि काही गोष्टींचा त्याग करावा लागला. पण त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी आभारी आहे."

माहिराची फवादसोबतची 'हमसफर' ही पाकिस्तानी मालिका खूप गाजली होती. त्यांच्या जोडीला पाकिस्तानातूनच नाही तर भारतातूनही प्रेम मिळालं होतं. तसंच माहिराने शाहरुख खानच्या 'रईस' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 

Web Title: Mahira Khan denied pregnancy talk says she is doing netflix show with fawad khan