​ पाहा, इंटरनेटवर धुमाकूळ घालणा-या प्रिया प्रकाश वारियरचे काही ‘खल्लास’ करणारे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 09:05 AM2018-02-12T09:05:58+5:302018-02-12T14:35:58+5:30

व्हॅलेन्टाईन वीकमुळे सगळे वातावरण रोमॅन्टिक झाले असतानाच गेल्या दोन दिवसांपासून या वातावरणाला आणखी रोमॅन्टिक करणारा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो ...

Look, some of the "Khalas" photos of Priya Prakash Warri who have shocked the Internet! | ​ पाहा, इंटरनेटवर धुमाकूळ घालणा-या प्रिया प्रकाश वारियरचे काही ‘खल्लास’ करणारे फोटो!

​ पाहा, इंटरनेटवर धुमाकूळ घालणा-या प्रिया प्रकाश वारियरचे काही ‘खल्लास’ करणारे फोटो!

googlenewsNext
हॅलेन्टाईन वीकमुळे सगळे वातावरण रोमॅन्टिक झाले असतानाच गेल्या दोन दिवसांपासून या वातावरणाला आणखी रोमॅन्टिक करणारा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो आहे. या व्हिडिओतील एका चेह-याने अख्खा सोशल मीडियाला वेड लावले आहे. हा चेहरा आहे मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिचा.



अनेकांना घायाळ करणा-या याच प्रिया प्रकाश वारियरचे आणखी काही सुंदर फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोमधील प्रियाचा अंदाजही खल्लास करणारा आहे. तिचे हास्यही तितकेच मनमोहक आहे.





प्रियाच्या आगामी चित्रपटातील एका गाण्याच्या व्हिडिओने सध्या लोकांना अक्षरश: वेड लावले आहे. व्हिडिओ प्रियाचा आगामी चित्रपट ‘ओरू अडार लव’ यातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याचा आहे.   या व्हिडिओत प्रिया नजरे नजरेत प्रेम व्यक्त करतेय. यातील प्रियाच्या अदा घायाळ करणा-या आहेत. त्यामुळे काही तासांतच हा व्हिडिओ टॉप ट्रेंडिंगमध्ये आलायं.





फेसबुक, व्हॉट्सअप, टिष्ट्वटर, इन्स्टाग्रामपासून युट्यूबवर हा व्हिडिओ वा-याच्या वेगाने व्हायरल होतो आहे.  मानिका मलयारा पूवी’ हे गाणे आत्तापर्यंत यु-ट्यूबवर  चार कोटींवर लोकांनी बघितले आहे. 




ALSO READ : व्हॅलेन्टाईन वीकमध्ये ‘या’ मुलीच्या प्रेमात पडलायं सोशल मीडिया! जाणून घ्या कोण आहे ती? 

प्रिया प्रकाश वारियर ‘ओरू अडार लव’ या चित्रपटाद्वारे अ‍ॅक्टिंग डेब्यू करतेय. १९ वर्षांची प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे.  डान्स हा तिचा जीव की प्राण. याशिवाय भटकंती हाही तिचा आवडता विषय. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्यार्थीनी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.
‘ओरू अडार लव’ या आपल्या पहिल्या चित्रपटात प्रिया एका किशोरवयीन मुलीच्या भूमिकेत आहे. किशोरवयात मनात फुलू लागलेल्या प्रेमाची कथा यात आहे.

Web Title: Look, some of the "Khalas" photos of Priya Prakash Warri who have shocked the Internet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.