संजूबाबाच्या पत्नीसोबत लिव इनमध्ये होता हा खेळाडू, आता या अभिनेत्रीसोबत करणार आहे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 11:16 IST2022-05-07T11:16:17+5:302022-05-07T11:16:58+5:30

Kim Sharma Leander Paes Wedding: प्रसिद्ध टेनिस खेळाडू लियांडर पेस आणि बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा लग्न करणार आहेत. बऱ्याच महिन्यांपासून लियांडर आणि किम रिलेशनशिपमध्ये आहेत.

Leander Paes to register court marriage with actress Kim Sharma | संजूबाबाच्या पत्नीसोबत लिव इनमध्ये होता हा खेळाडू, आता या अभिनेत्रीसोबत करणार आहे लग्न

संजूबाबाच्या पत्नीसोबत लिव इनमध्ये होता हा खेळाडू, आता या अभिनेत्रीसोबत करणार आहे लग्न

Kim Sharma Leander Paes Wedding: सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन सुरू आहे. अनेक कपल्स लग्नगाठ बांधून आयुष्यभरासाठी एक होत आहेत. अशातच आता  प्रसिद्ध टेनिस खेळाडू लियांडर पेस आणि बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा लग्न करणार आहेत. बऱ्याच महिन्यांपासून लियांडर आणि किम रिलेशनशिपमध्ये आहेत. आता या कपलने लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतलाय.

प्रसिद्ध टेनिस खेळाडू लियांडर पेस आणि अभिनेत्री किम शर्माने रिलेशनशिप ऑफिशिअल केल्यानंतर नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले होते. आता या लोकप्रिय जोडीने त्यांच्या नात्याला लग्नाचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, लियांडर लग्न करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. 

दोघांच्याही परिवाराने त्यांच्या नात्याचा स्वीकार केला आहे आणि लग्नासाठी परवानगी दिली आहे. रिपोर्टसनुसार, लियांडरचे आई-वडील या कपलला भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत आणि ते किमच्या घरी आहेत. आता दोन्ही परिवार मिळून कोर्ट मॅरेजची तयारी करत आहे.

मार्च महिन्यात या कपलने त्यांच्या रिलेशनशिपची पहिली अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती. यावेळी त्याने खास पोस्ट करत फोटो शेअर केले होते. लियांडरचं वय ४८ वर्षे असून किम आता ४२ वर्षांची आहे. 

किम आणि लियांडर नेहमीच त्यांच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत राहत होते. किमचं नाव याआधी युवराज सिंह आणि हर्षवर्धन राणे यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. तेच लियांडर पेस ह संजय दत्तची एक्स वाइफ रिया पिल्लईसोबत अनेक वर्ष लिव इन रिलेशनशिपमध्ये होता. रिया पिल्लईने लियांडर पेस विरोधात कौटुंबिक हिंसेचा गुन्हा दाखल केला होता.
 

Web Title: Leander Paes to register court marriage with actress Kim Sharma