विकी कौशलचा तृप्तीसोबत रोमान्स, तोच लंडनवरुन परतली कतरिना; प्रेग्नंसीच्या चर्चांना पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 08:53 AM2024-07-11T08:53:34+5:302024-07-11T08:54:21+5:30

एकीकडे विकी कौशल आणि तृप्ती डिमरीच्या केमिस्ट्रीने आग लावली असताना दुसरीकडे कतरिना आता परत आली आहे.

Katrina Kaif back from london pregnancy talks are shut whereas Vicky Kaushal romance with Tripti Dimri viral | विकी कौशलचा तृप्तीसोबत रोमान्स, तोच लंडनवरुन परतली कतरिना; प्रेग्नंसीच्या चर्चांना पूर्णविराम

विकी कौशलचा तृप्तीसोबत रोमान्स, तोच लंडनवरुन परतली कतरिना; प्रेग्नंसीच्या चर्चांना पूर्णविराम

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये होती. विकी आणि कतरिनाचे लंडनमध्ये फिरतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. तेव्हा कतरिना प्रेग्नंट असल्याच्याही चर्चा सुरु होत्या. तिचा बेबी बंपही दिसल्याचा दावा करण्यात आला होता. पण आता काल रात्रीच कतरिना मुंबई विमानतळावर आली. तिला पाहून प्रेग्नंसीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. एकीकडे विकी कौशल (Vicky Kaushal) आणि तृप्ती डिमरीच्या केमिस्ट्रीने आग लावली असताना दुसरीकडे कतरिना आता परत आली आहे.

सध्या सगळीकडे विकी कौशलच्या आगामी 'बॅड न्यूज' सिनेमाची चर्चा आहे. यामधील 'तौबा तौबा' गाण्यावर विकीने केलेल्या डान्सचं खूप कौतुक होतंय. तर आणखी एका गाण्यात विकी आणि तृप्ती डिमरीने इंटिमेट सीन्स दिलेत. विकी आणि तृप्ती डिमरीच्या रोमँटिक केमिस्ट्रीची चर्चा सुरु असतानाच आता विकीची पत्नी कतरिना लंडनवरुन परत आली आहे. काल रात्री कतरिना मुंबई विमानतळावर दाखल झाली. पांढरा शर्ट, निळी जीन्स, काळं जॅकेट, शूज आणि गॉगल अशा कॅज्युअल लूकमध्ये ती दिसली. कतरिनाला पाहताच पापाराझींनी गर्दी केली. 

कतरिना कैफ यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात आलेल्या 'मेरी ख्रिसमस' सिनेमात दिसली होती. यानंतर तिचा एकही सिनेमा आलेला नाही. सध्या कतरिना काय करतेय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर दुसरीकजे विकी कौशल मात्र एकापेक्षा एक सिनेमांमध्ये दिसतोय. त्याचा आणि तृप्ती डिमरीचा 'बॅड न्यूज' १९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

Web Title: Katrina Kaif back from london pregnancy talks are shut whereas Vicky Kaushal romance with Tripti Dimri viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.