'जास्त झूम करायचं नाही हा'; करिश्मा कपूरने दिली पापाराझींना तंबी; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:14 IST2026-04-29T10:13:52+5:302026-04-29T10:14:53+5:30
Karisma kapoor: अनेकदा अभिनेत्रींचे फोटो नको त्या ठिकाणी झूम केले जातात ज्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

'जास्त झूम करायचं नाही हा'; करिश्मा कपूरने दिली पापाराझींना तंबी; व्हिडीओ व्हायरल
फोटो चुकीच्या पद्धतीने झूम करुन काढण्याविषयी अनेक अभिनेत्रींनी आवाज उठवला आहे. अभिनेत्रींचे फोटो नको त्या ठिकाणी झूम केले जातात ज्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. इतकंच नाही तर त्यांच्या इमेजलाही याचा धक्का बसतो. म्हणूनच, आता फोटो झूम करुन काढणाऱ्या पापाराझींवर अभिनेत्रींनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. यामध्येच आता अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने पापाराझींना फोटो काढतांना काळजीपूर्वक काढण्याची तंबी दिली आहे.
करिश्माचा 'इंडियाज बेस्ट डान्सर सीजन 5' या शोच्या सेटवरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने फोटोसाठी पोझ दिल्या. मात्र, फोटो काढत असतांनाच तिने पापाराझींनी चुकीच्या पद्धतीने फोटो काढू नका, अशी तंबीही दिली.
''जास्त झूम करुन फोटो काढू नका'', असं स्पष्ट शब्दांत करिश्माने पापाराझींना सांगितलं. करिश्माचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही तिला सपोर्ट केला आहे. मध्यंतरी कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा एका इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. यावेळी पापाराझींनी कियाराचा फोटो चुकीच्या पद्धतीने क्लिक केला होता.
दरम्यान, करिश्मा लवकरच 'इंडियाज बेस्ट डान्सर सीजन 5' या शोमध्ये परिक्षकाची भूमिका पार पाडणार आहे. या शोमध्ये तिच्यासोबत टेरेंस लुईस, गीता कपूर दिसणार आहेत. तसंच या शोचं सूत्रसंचालन जय भानुशाली आणि अनिकेत चौहान करणार आहेत.