करण जोहरने दाखवली 'कॉफी हॅम्पर'ची झलक, 'या' महागड्या वस्तूंचा असतो समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 16:23 IST2024-01-25T16:16:16+5:302024-01-25T16:23:29+5:30

करण जोहरने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे.

Karan Johar showed a glimpse of the Coffee Hamper which includes these costly items | करण जोहरने दाखवली 'कॉफी हॅम्पर'ची झलक, 'या' महागड्या वस्तूंचा असतो समावेश

करण जोहरने दाखवली 'कॉफी हॅम्पर'ची झलक, 'या' महागड्या वस्तूंचा असतो समावेश

दिग्दर्शक, निर्माता करण जोहरचा (Karan Johar) लोकप्रिय शो 'कॉफी विद करण' (Koffee With Karan 8) चा नुकताच 8 वा सिझन संपला. याहीवेळी करणने अनेक सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याची पोलखोल केली. दरम्यान दरवेळी 'कॉफी विद करण' एक आकर्षक गोष्ट असते ती म्हणजे 'कॉफी हॅम्पर' (Koffee Hamper). रॅपिड फायर राऊंड जिंकणाऱ्यांना हा आकर्षक भरगच्च हॅम्पर मिळतो. पण या कॉफी हॅम्परमध्ये नक्की असतं तरी काय असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. तर या प्रश्नाचं उत्तर देत खुद्द करण जोहरनेच हॅम्पर अनबॉक्स केला आहे.

करण जोहरने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने 'कॉफी हॅम्पर' मध्ये सेलिब्रिटींना नक्की काय काय मिळतं हे दाखवलं आहे. 


1.सर्वात आधी हॅम्परमधून त्याने एक नेकलेस बाहेर काढला. करण जोहरचाच 'त्यानी' या ब्रँडचा महागडा नेकलेस फारच आकर्षक आहे. वेडिंग कलेक्शनसाठी हा ब्रँड प्रसिद्ध आहे. २२ कॅरेट सोन्यापासून बनलेला नेकलेस या हॅम्परमध्ये आहे. 

2. गो प्रो हिरो इलेव्हन कॅम

3. sono स्पीकर्स

4. गुगल पिक्सल 8 pro हा १ लाखाचा मोबाईलही या हॅम्परमध्ये आहे

5.थेराबॉडी मसाज गन

6. Libre (HIS/HER) परफ्युम 

7. अलमन्ड शॉवर ऑईल

8. चीझ नाईफ सेट

9. आनंदिनी हिमालया टी

10. ट्वेंटी सेव्हन बेक हाऊस केक

11. बार चॉकलेट मेकर

12. टीनेशियस बी हनी

13. ग्लुटन फ्री बेक फज बार

ही लिस्ट वाचून तुम्हीही चकित झालाच असाल. करणच्या या कॉफी हॅम्परची एकूण किंमतच लाखो रुपये असणार आहे. करिना कपूर असो किंवा भट प्रत्येकालाच या हॅम्परची उत्सुकता असते हे शोमध्ये आपण पाहिलं आहे. अखेर आज हॅम्परमधील सरप्राईज उलगडलं आहे.

Web Title: Karan Johar showed a glimpse of the Coffee Hamper which includes these costly items