ड्रिम गर्लच्या बर्थ डे पार्टीत जया बच्चन यांनी आधी दिली पापाराझींना पोझ मग अचानक भडकल्या, म्हणाल्या,"तुम्ही लोक"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 11:30 IST2023-10-17T11:18:45+5:302023-10-17T11:30:06+5:30

हेमा मालिनी यांच्या बर्थ डे पार्टीतील जया बच्चन यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Hema malini birthday party jaya bachchan scolds paparazzi for giving her and padmini kolhapure direction | ड्रिम गर्लच्या बर्थ डे पार्टीत जया बच्चन यांनी आधी दिली पापाराझींना पोझ मग अचानक भडकल्या, म्हणाल्या,"तुम्ही लोक"

ड्रिम गर्लच्या बर्थ डे पार्टीत जया बच्चन यांनी आधी दिली पापाराझींना पोझ मग अचानक भडकल्या, म्हणाल्या,"तुम्ही लोक"

‘कोरा कागज’, ‘कोशिश’, ‘झंजीर’, ‘सिलसिला’ अशा अनेक हिट चित्रपटांत काम करुन जया बच्चन यांनी ७०चं दशक गाजवलं. जया बच्चन यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमध्ये त्या अनेकदा पापाराझींवर चिडताना दिसतात. जया बच्चन यांनी डिमगर्ल हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. दरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

हेमा मालिनी यांनी 16 ऑक्टोबरला आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी अभिनेत्रीने मुंबईत एक ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. या बर्थ डे पार्टील जवळपास संपूर्ण बॉलिवूड आलं होतं. यामध्ये जया बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे.

आता हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्या पद्मिनी कोल्हापुरे आणि रश्मी ठाकरे यांच्यासोबत दिसत आहे. जया, पद्मिनी आणि रश्मी ठाकरे तिघीही पापाराझींसमोर आल्या आणि फोटो क्लिक केले. यावेळी जया बच्चन खूप आनंदी दिसत होत्या. त्या पापाराझींना  म्हणाल्या, या पद्मिनीने मला इथं आणलं आहे. यावर पापाराझींनी उत्तर दिले आणि म्हणाले, जयाजींना आणणे खूप कठीण आहे.

अचानक भडकल्या जया बच्चन
दरम्यान, पापाराझी जया बच्चन यांना कॅमेराकडे पाहण्यास सांगत होते. ज्यावर त्या अचानक चिडल्या आणि म्हणाल्या, आता तुम्ही लोक इतक्या सूचना (डायरेक्शन) देऊ नका. पार्टीतला आता या अभिनेत्रीचा व्हिडीओ होतोय व्हायरल होतोय.

Web Title: Hema malini birthday party jaya bachchan scolds paparazzi for giving her and padmini kolhapure direction